Home | International | Bhaskar Gyan | Worlds 10 mysterious peoples

या आहेत जगातील 10 रहस्यमयी व्यक्ती, यांबद्दल कोणालाच काहीही माहित नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 05:03 PM IST

मानव विश्व अनेक रहस्यमयी घटनांनी भरलेले आहे.

 • Worlds 10 mysterious peoples

  स्पेशल डेस्क - मानव विश्व अनेक रहस्यमयी घटनांनी भरलेले आहे. याठिकाणी नेहमीच काही ना काही रहस्यमय गोष्टी घडत असतात. यात काही वस्तू असतात तर काही ठिकाणं असतात. अशाच प्रकारे जगात काही रहस्यमयी व्यक्ती आहेत. या व्यक्तींबद्दल अद्यापही कोणाला काही विशेष अशी माहिती नाही. तर काहींची ओळख देखील पटलेली नाही. अशाच या 10 रहस्यमयी व्यक्तींबद्दल आम्ही आपल्याला सांगत आहोत.

  1. डी.बी.कुपर
  डी.बी.कुपर अमेरिकी वायूयान सेवेच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची व्यक्ती आहे. याने अमेरिकी विमानाला हवेतच हायजॅक केले होते. त्यानंतर विमान जमिनीवर लँड होण्याच्या अगोदर पॅरेशूटच्या सहाय्याने विमानातून कोठेतरी उतरला. कित्येक प्रयत्नांनंतरही अमेरिकी संस्थांना त्याला पकडण्यात अपयश आले आहे. अद्यापही कूपर कोठे आहे याचा कोणालाही थांगपत्ता नाहीये.

  अशाच इतर रहस्यमयी व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

 • Worlds 10 mysterious peoples

  2. टँक मॅन
  4 जुन 1989 रोजी चीनमध्ये त्यागमंद चौकात चीनी सेनेद्वारे विद्यार्थ्यांचा मोर्चा थांबविण्यासाठी त्यांच्या समोर रणगाडे नेण्यात येत होते. त्यावेळी या टँकसमोर ही व्यक्ती आली होती. पण अद्यापही या व्यक्तीची ओळख झालेली नाहीये. सदर व्यक्ती दोन वेळा सेनेच्या रणगाड्यासमोर आली होती. त्याने टँक चालवणाऱ्या सैनिकांशी संवाद देखील साधला होता. पण त्याचा चेहरा कोणीही पाहू शकले नाही. त्यानंतर ती व्यक्ती विद्यार्थ्यांच्या घोळक्यात मिसळून गेली. अद्यापही या व्यक्तीची ओळख पटलेली नसून ती एक रहस्य बनलेली आहे. 

 • Worlds 10 mysterious peoples

  3. द बबुश्का लेडी
  अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ कॅनेडी यांच्या हत्येवेळी एका महिलेला तिथे पाहण्यात आले होते. ती अनेक लोकांच्या कॅमेरात कैद झाली आहे. असे म्हणल्या जाते की, कॅनेडी यांची हत्या तिनेच केली आहे. तिच्या कॅमेरासारख्या दिसणाऱ्या पिस्तुलातून गोळी झाडली असावी. हत्या केल्यानंतर ती महिला गर्दीमध्ये मिसळून गेली. अनेक प्रयत्नांनंतरही तिचा शोध लागला नाही. ती कोठून आली? आणि तिने कॅनेडी यांची हत्या का केली? हे आजही एक रहस्य आहे.

 • Worlds 10 mysterious peoples

  4. ग्रीन चिल्ड्रन्स इन वूलपिट
  12 शतकात एक मुलगा आणि एक मुलगी अचनाकपणे सॅफोलच्या ओलपिड गावात दिसले होते. त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा होता. ते वेगळीच भाषा बोलत होते. तसेत बीन्स व्यतिरिक्त काही खात नव्हते. त्यानंतर त्यांनी हळूहळू इंग्रजी भाषा आत्मसात केली तसेच बीन्स व्यतिरिक्त इतर खाद्यपदार्थ खाऊ लागले. त्यांच्यातील मुलाचा आजाराने मृत्यू झाला. मुलीने सांगितले की, ते दोघे जमिनीच्या खाली दबलेल्या सेंट मार्टिन्स लँडवरून येथून आले आहेत. तेथे सूर्याची किरणे पोहोचत नाहीत तसेच तेथील सर्वकाही हिरव्या रंगाचे आहे. पण त्यांचे हे रहस्य अजुनही उलगडले नाही. ते कोण होते आणि कोठून आले होते हे अद्यापही एक रहस्यच राहिले आहे. 

 • Worlds 10 mysterious peoples

  5. द फॉलिंग मॅन
  9/11  रोजी अमेरिकेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यावेळी हल्ला झालेल्या इमारतीवरून उलटा खाली पडण्याचा फोटो कॅमेरात कैद झाला होता. पण ती व्यक्ती कोण होती हे अद्यापही समजले नाहीये. अनेकांचे म्हणणे होते की, तो एका रेस्त्राँमध्ये काम करणारी व्यक्ती आहे पण याबाबत खात्री नाहीये. 

 • Worlds 10 mysterious peoples

  6. जॅक द रिपर
  आपण जॅक द रिपर हे पात्र अनेक चित्रपट, नाटक, मालिकामध्ये ऐकले किंवा पाहिले असेल. याने 18 व्या शतकात 11 महिलांची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर त्या महिलेंच्या मृतदेहाची अशी अवस्था करायचा की, त्यांची ओळख पटत नव्हती. पण त्या 11 महिलांव्यतिरिक्त त्याला कोणाही पाहिले नाही. जॅक द रिपर आजही एक रहस्यच आहे. 

 • Worlds 10 mysterious peoples

  7. अ मॅन फ्रॉम टॉरस
  1954 साली जपानच्या टोकियो विमानतळावर एक व्यक्ती आली होती. सुरक्षा रक्षकांनी त्याची विचारपूस केली असता तो टॉरस या देशातून आला असल्याचे समजले. त्याचे पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट टॉरसचे नाव होते. पण सुरक्षा रक्षकांनी टॉरस देशाचे नाव कधी ऐकले नव्हते. नंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला जवळच्या हॉटेलामध्ये थांबण्यास सांगितले आणि दोन अधिकाऱ्यांना त्याच्यावर नजर ठेवण्यास सांगितली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती व्यक्ती हॉटेलमधून रहस्यमयरित्या गायब झाली. 

 • Worlds 10 mysterious peoples


  8. रहस्यमय मृतदेह
  1940 मध्ये डेथ व्हॅलीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या मृतदेहाजवळ तिचा पासपोर्ट जळालेल्या अवस्थेत मिळाला होता. तसेच तिच्याकडे 9 फेक ओळखपत्र मिळाले होते. डॉक्टरांनी सांगितले की, झोपेच्या गोळ्यांचे अति सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला पण काहीजणांचे असे म्हणणे आहे की तिची हत्या करण्यात आली आहे. पण तिच्या मृत्यूमागचे सत्य कोणालाही समजले नाही. ही महिला कोण होती? कोठून आली होती? हे रहस्यच राहिले

 • Worlds 10 mysterious peoples

  9. सुडान येथील मुलगा
  प्रसिद्ध फोटोजर्नलिस्ट केविन कार्टर सुडानच्या दौऱ्यावर असताना हा फोटो काढला होता. यामध्ये सुडानच्या तत्कालिन परिस्थितीविषयीची जाणीव होते. फोटोत एक मुलगा मृत्यूच्या दारात असताना गिधाड त्याच्या मरणाची वाट पाहत होते. या फोटोने सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. पण त्या मुलाची ओळख अजुनही झालेली नाही. फोटो काढल्याच्या एका वर्षानंतर केविन कार्टर यांनी नैराश्यामुळे आत्महत्या केली होती.  

 • Worlds 10 mysterious peoples

  10. द शॅडो मॅन

  दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. या स्फोटात 3 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हा फोटो स्फोटाच्या अंदाजे 900 मीटर अंतरावर घेण्यात आला आहे. येथे एखादी व्यक्ती बसली होती. अणूबॉम्बने त्याला पूर्णपणे नष्ट केले पण त्याच्या सावलीला नष्ट करता आले नाही. ती सावली कोणत्या व्यक्तीची होती हे एक रहस्यच राहिले आहे. 

Trending