Home | International | Other Country | World's biggest Airplane took take off

अमेरिका : जगातील सर्वात मोठ्या विमानाचे उड्डाण; दोन एअरक्राफ्ट बाॅडी असलेल्या विमानास ६ इंजिन.

वृत्तसंस्था | Update - Apr 15, 2019, 12:07 PM IST

आता विमानातून उपग्रह सोडले जातील, खर्चात घट

 • World's biggest Airplane took take off

  लॉस एंजलिस - जगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचने शनिवारी कॅलिफोर्नियात पहिल्यांदाच यशस्वी उड्डाण केले. त्याची चाचणी सुमारे अडीच तास वाळवंटावरील आकाशात झाली. ताशी ३०२ किमी वेगाने हे विमान १७५०० फूट उंच उड्डाण करू शकत होते.

  आता विमानातून उपग्रह सोडले जातील, खर्चात घट
  हे विमान उपग्रहाला अंतराळात त्याच्या कक्षेत सोडण्यासाठी मदत करू शकेल. सध्या टेकऑफ राॅकेटच्या मदतीने उपग्रहांंचे प्रक्षेपण केले जाते. या यशानंतर उपग्रहांना कक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विमान आता अत्यंत चांगला पर्याय ठरेल. शिवाय खर्चही कमी येईल.

  सहा बोइंग ७४७ इंजिन लावले
  दोन एअरक्राफ्ट बॉडीपासून हे विमान तयार करण्यात आले. ते परस्परांत जोडलेले आहे. सहा बोइंग ७४७ इंजिन लावलेले आहेत. पंखांची लांबी ३८५ फूट आहे. उपग्रह लाँच पॅड म्हणून विकसित करण्यात आले. वजन- ५ लाख पौंड.

  हे उड्डाण मैलाचा दगड : नासा
  नासामध्ये विज्ञान संचालनालयाचे सहायक प्रशासकीय अधिकारी थॉमस जुर्बुचेन म्हणाले, हे विमान उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले. अंतराळाच्याही पलीकडे जाण्याची याची क्षमता.

  > 17,500 फूट उंचीवर अडीच तास आकाशात उड्डाण, उपग्रहासाठी प्रक्षेपकासारखा वापर केला जाणार

  > फुटबॉल मैदानाहून मोठ्या पंख्यांचा विस्तार

  > स्ट्रॅटोलाँचचे यशस्वी उड्डाण : कॅलिफोर्नियाच्या मोजेव्ह एअर अँड स्पेस पोर्टवरून स्ट्रॅटोलाँचने पहिले उड्डाण केले.

Trending