आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये जगातील पहिली विनाचालक बुलेट ट्रेन, १७ डब्ब्यांतून १२८३ लोक करतील प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये जगातील पहिली चालकविना बुलेट ट्रेन शनिवारपासून सुरू झालेली आहे. या ट्रेनचे नाव फुक्सिंग बुलेट ट्रेन असे आहे. याचा वेग ताशी ३५० किमी इतका आहे. पहिल्या दिवशी ही रेल्वे बीजिंग-शांघाय मार्गावर धावली. चायना अकादमी ऑफ रेल्वे सायन्सेसच्या संशोधकांनी सांगितले, या रेल्वेला १७ डबे आहेत. रेल्वेची लांबी ४३९ मीटर इतकी आहे. या रेल्वेतून १२८३ जण प्रवास करू शकतील. ही रेल्वे आपोआप सुरू होऊन निघेल. स्थानकादरम्यान थांबेलही. या बुलेट ट्रेनची चाचणी गेल्या वर्षी घेण्यात आली. चीनच्या तज्ञांच्या मते, सुरक्षेच्या दृष्टीने या रेल्वे खूप चांगल्या आहेत. रेल्वेत एक-एक अटेंडट  तैनात आहे. रेल्वेमध्ये बिघाड व इतर कामाची जबाबदारी त्याच्याकडे असेल.