• Home
  • Worlds first maritime cemetery in Kozhikode, to pay tribute to extinct fish

केरळ / कोझिकोडमध्ये उभारण्यात आले जगातिल पहिले समुद्री कब्रस्तान, विलुप्त होत असलेल्या माशांना श्रद्धांजली दिली

  • समुद्री कब्रस्तानमध्ये सीहॉर्स, पॅरटफिश, लेदरबॅक कासवं, ईगल रेज, हॅमरहेड माशांना श्रद्धांजली देण्यात आली

दिव्य मराठी वेब टीम

Dec 13,2019 11:12:00 AM IST

कोझिकोड- सिंगल यूज प्लास्टिकमुळे वाढत असलेल्या प्रदुषणप्रती लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी केरळमधील कोझिकोडमध्ये प्लास्टिकच्या बॉटलपासून जगातील पहिले समुद्री कब्रस्तान बनवण्यात आले आहे.

या कब्रस्तानला विलुप्त होत असलेल्या माशांना श्रद्धांजली देण्यासाठी बनवले. यात सीहॉर्स, पॅरटफिश, लेदरबॅक कासवंम, ईगल रेज, सॉफिश, जेबरा शार्क, हॅमरहेड आणि केरळमधील स्तानिक गोड्या पाण्यातील मासे सामील आहेत.


...तर माशांच्या अनेक प्रजाती विलुप्त होतील


एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हा उपक्रम लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी केला जात आहे. जर आपण असेच प्लास्टिक समुद्रात टाकत राहू तर माशांच्या अनेक प्रजाती विलुप्त होतील." एका रिपोर्टनुसार, जल प्रदूषण आणि जलवायु परिवर्तनामुळे 700 प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आहे.

X
COMMENT