आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई । आतापर्यंत तुम्ही काेणत्याही गेमिंग झाेनमध्ये आनंद लुटण्यासाठी व्हर्च्युअल रिअॅलटी क्रिकेटचा सामना खेळला असेल. आता जगातील पहिल्या याच स्वरूपातील क्रिकेट लीगला सुरुवात झाली आहे. तेही वीरेंद्र सेहवाग, मॅक्लुम, सुरेश रैना, हरभजन सिंग आणि पृथ्वी शाॅसारख्या दिग्गज खेळाडूंसाेबत .
मुंबईमध्ये आरबी क्रिकेट सुपर ओव्हर लीगला सुरुवात झाली. यामध्ये व्हीआर तंत्रप्रणालीच्या आधारे गेमिंग झाेनमध्ये असा क्रिकेटचा सामना खेळला जाताे. या वेगळ्या प्रकारच्या फाॅरमॅटमध्ये दाेनच खेळाडूंमध्ये हा सामना हाेताे. यात एकीकडे गाेलंदाज आणि दुसरीकडे फलंदाज असताे. आता तुम्ही यात तुमच्या आवडीच्या देशाचे मैदानही निवड करू शकता. ज्या मैदानाची निवड केली, त्याचे मैदानाचे वास्तवदर्शी चित्र समाेर येते आणि मग त्याच मैदानावर क्रिकेट खेळल्याचा आनंद घेता येताे. उदाहरणार्थ काेलकात्याच्या इडन गार्डनची निवड केली तर येथील सर्व चित्र तुम्हाला अनुभवता येईल. तसेच फलंदाज हा आपल्या आवडीनुसार खेळपट्टी आणि गाेलंदाजीची स्टाइलही निवड करू शकताे. म्हणजेच त्याला गाेलंदाजी वेगवान हवी की फिरकीची.
मॅक्लुमची सलामीला सेहवागवर मात; हरभजनसमाेर आता रैनाचे आव्हान
लीगच्या सलामीला मॅक्लुमने भारताच्या वीरेंद्र सेहगावला पराभूत केले. त्याने प्रथम फलंदाजी करताना १० धावा काढल्या. प्रत्युत्तरात सेहवाग अपयशी ठरला. त्यानंतर दुसरा सामना व्हीव्हीएस लक्ष्मण आणि दिलशान यांच्यात झाला.
लीगचा फाॅरमॅट
२१ मार्च सुरेश रैना हरभजन सिंग
२४ मार्च शुभमान गिल पृथ्वी शाॅ
२७ मार्च हर्शल गिब्स माे. कैफ
३० मार्च क्रिस लीन आंद्रे रसेल.
> अव्वल स्थानावरील संघ फायनलसाठी पात्र ठरेल. दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील खेळाडूमध्ये ३, ६ आणि ९ एप्रिल राेजी उपांत्य सामने हाेतील. यातील दाेन सामने जिंकणारा संघ फायनलमध्ये
> १३, १७ व २० एप्रिल राेजी दाेन्ही फायनलिस्ट संघांतील तिन्ही खेळाडूंमध्ये अंतिम सामना हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.