आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग- बीजिंगचे नवे दाछिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू होईल. ७ लाख चौरस मीटर टर्मिनलच्या परिसराच्या दृष्टीने हे जगातील सर्वात मोठे विमानतळ असेल. सध्या जगातील सर्वात मोठ्या दुबई विमानतळावरील टर्मिनलचा परिसर १९ लाख चौ. मीटर आहे. मात्र, यात ३ टर्मिनल आहेत. मोठे असले तरी दाछिंगमध्ये प्रवाशांना कमी चालावे लागणार आहे. त्यासाठी स्टारफिशचा आकार देण्यात आला आहे. सुरक्षा तपासणी ते बोर्डिंग गेटचे कमाल अंतर ६०० मीटर असेल. विमानतळाच्या आकाराच्या दृष्टीने हे सर्वात कमी आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाच्या टी-३ मध्ये हे अंतर सुमारे २ किमी आहे.
दाछिंगमध्ये विमान उतरल्यानंतर १३ मिनिटांत सामान मिळेल. पाचव्या मजल्यावरील काचेच्या पुलावरून नातेवाईक सुरक्षा तपासणीपर्यंत प्रवाशाला पाहू शकतील. इतर कोणत्याही विमानतळावर असे होत नाही. चीनमध्ये १३९ विमानतळे आहेत. ६२ वर फेस-रिकॉग्निशन तंत्रज्ञान आहे. दाछिंगमध्येही ही सुविधा असेल. टर्मिनल रेल्वे मार्गाला जोडलेले असेल. या रेल्वेही २५० किमीच्या गतीने धावतील. विमानतळ बीजिंग शहरापासून ५० किमी दूर आहे. रेल्वेने विमानतळापर्यंत केवळ ११ मिनिटे लागतील.
१००० अँटी-शॉक कुशन
विमानतळाच्या जमिनीखालील दोन मजले रेल्वे टर्मिनलला जोडलेले असतील. हादऱ्यांपासून वाचण्यासाठी टर्मिनलखाली रबराचे १,००० अँटी-शॉक कुशन लावण्यात आलेले आहेत.
विमानतळ पूर्ण झाल्यावर असतील ७ रनवे
सप्टेंबरमध्ये ४ रनवे चालू होतील. २०२५पर्यंत वर्षाला ७.२ कोटी प्रवासी ये-जा करू शकतील. काम पूर्ण झाल्यावर ७ रनवे होतील. तेव्हा प्रवासी क्षमता १० कोटींची होईल
बीजिंगमध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ का?
सध्याच्या राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्याची शक्यता नाही. त्याची क्षमता ७.५ कोटी असताना २०१७ मध्ये येथे ९.५ कोटी लोक आले. क्षमता नसल्याने नेहमीच उशीर होतो. बीजिंगसारख्या जगातील इतर शहरांत दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
१० कोटी वार्षिक प्रवासी क्षमता असेल
८३ हजार कोटी रु. खर्चाचा अंदाज
१,७०० विमाने रोज ये-जा करतील
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.