आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : समुद्राच्या थंड हवेसोबत प्रवास करणे कोणाला आवडणार नाही. यामुळेच तर क्रूज ट्रीपला लोकांची पसंती मिळत असते. जगातील काही ठिकाणी समुद्रमार्गाने जाणे मजेशीर वाटते. गेल्या काही वर्षात 'क्रूज शॉप'च्या रूपात समुद्र पर्याटनाचा एक आधुनिक अंदाज समोर आला आहे. यामध्ये प्रवासी आरामदायी प्रवासासोबत लाटांचा अनुभव घेतात. हे प्रवास थोडा महाग जरी असला तरी आपला प्रवास आठवणीत राहतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लग्झरी क्रूजविषयी सांगत आहोत. हे क्रूज एखाद्या शाही राजवाड्यापेक्षा कमी नाहीत. आपल्याकडे बजेट जर चांगले असेल तर आपणही या शानदार क्रूजचा आवश्य आनंद घ्या.
कॅरेबियन क्रूज (Caribbean Cruise)
समुद्रातील रोमांचक प्रवासाठी ग्रँड केमॅन आयलँडवर जाऊ शकतात. येथे पायरेट क्रूज आहे. याला कॅरेबियन क्रूज देखील म्हणतात. प्रत्येक व्यक्तीसाठी खुल्या असणाऱ्याया क्रूजमध्ये 17 व्या शतकातील झलक पाहायली मिळते. यामध्ये बाण-धनुष्य आणि तलवार युद्धाचा सहजरित्या अनुभव घेऊ शकता. जॉर्ज टाऊन हे येथील मोठे शहर आहे. हा संपूर्ण परिसर ब्रिटनचा भाग असल्याचे समजले जाते.
हार्मनी ऑफ द सीज
हार्मनी ऑफ द सीज जगातील सर्वात मोठे क्रूज शिप आहे. 1 लाख 20 हजार टन वजनी हार्मनीने आपला पहिला प्रवास साँ नजेअरपासून सुरू केला होता. याची रूंदी 66 मीटर असून लांबी 362 मीटर आहे. आयफिल टॉवरची उंजी हार्मनीच्या उंची पेक्षा 50 मीटर कमी आहे. हार्मनी समुद्रावर तरंगाणारी एखाद्या वस्ती प्रमाणे आहे. 16 मजले असलेल्या या क्रूजची किंमत अंदाजे 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 66 अब्ज रूपये आहे. यामध्ये 6360 प्रवाशांसाठी जागा आहे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी 2100 क्रू मेंबर असतात.
इतर क्रूजविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.....
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.