आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिनलंड दुसऱ्यांदा जगातील सर्वाधिक आनंदी देश, भारत १४० व्या तर पाकिस्तान ६७ व्या स्थानावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूयॉर्क - जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या सूचीमध्ये फिनलंडने दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताचे स्थान या सूचीत सात क्रमांकांनी घसरून १४० व्या स्थानावर गेले आहे. १५६ देशांच्या या सूचीमध्ये दक्षिण सुदान सर्वात कमी आनंदी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कद्वारे बुधवारी जाहीर केलेल्या जागतिक आनंदी अहवाल-२०१९ नुसार टॉप-१० आनंदी देशांमध्ये सात देश युरोपातील आहेत. टॉप-२० मध्ये आशियातील एकही देश नाही. भारताचा शेजारी देश पाकिस्तान या सूचीमध्ये ६७ व्या स्थानावर आहे. अमेरिका गेल्या काही वर्षांत श्रीमंत तर झाला परंतु, तेथील आनंदाच्या स्तरात घसरण झाली आहे. यावेळी अमेरिकेचे स्थान १९ राहिले. या सूचीमध्ये अमेरिकेची सातत्याने घसरण होत आहे. २०१७ मध्ये अमेरिका १४ व्या स्थानावर होते. अमेरिका आजपर्यंत एकदाही या सूचीमध्ये टॉप-१० मध्ये येऊ शकला नाही. दुसरीकडे ब्रिटनने आपल्या स्थानामध्ये चांगली सुधारणा केली आहे. १८ व्या स्थानावरून तीन अंकांनी सुधारणा करत ब्रिटन १५ व्या स्थानावर आला आहे. 


अहवालानुसार जर्मनी, रशिया, जपान आणि चीन यासारख्या सुपर पॉवर देशांतही आनंदाचा स्तर सातत्याने घसरत आहे. जर्मनी दोन स्थानांनी घसरून १७ व्या स्थानावर तर चीन ८६ स्थानावरून ९३ व्या स्थानावर घसरला आहे. जगातील सर्वाधिक आनंदी देशांना सूचीबद्ध करण्यासाठी भूतानने २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रात एक प्रस्ताव ठेवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक वर्षी २० मार्चला जागतिक आनंदी दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा २०१२ मध्ये घोषित केलेल्या सूचीमध्ये भूतान पहिल्या क्रमांकावर होते. या वर्षी भूतान ९५ व्या क्रमांकावर आहे. आनंदाचा स्तर मोजण्यासाठी सहा बाबींवर प्रश्न तयार केले जातात. संबंधित देशातील प्रतिव्यक्ती जीडीपी, सामाजिक सहकार्य, उदारता आणि भ्रष्टाचार, सामाजिक स्वातंत्र्य आणि निरोगी जीवनाच्या आधारावर ही रँकिंग केली जाते. 

बातम्या आणखी आहेत...