आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : जगातील सर्वात श्रीमंत, ७०० काेटींची मालकीण मांजरीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क -  सर्वात श्रीमंत व चर्चित सात वर्षांची मांजर ग्रुंपीचे निधन झाले आहे. ग्रुंपी कॅट १०० मिलियन डाॅलर ( सुमारे ७०० काेटी रुपये)ची मालकीण हाेती. तिच्या मृत्यूवर लाेकांनी साेशल मीडियावर शाेक प्रकट केला आहे. ग्रुंपीची गणना जगातील सर्वात चिडखाेर मांजरीत केली जात हाेती. ती नाक व भुवया माेडण्यात खूप प्रसिद्ध हाेती. तिच्यावर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांची एक मालिका हाेती. ग्रुंपी कॅटवर एक चित्रपट तयार करण्यात आला आहे.


माॅरिसटाऊनच्या तबाथा बुंडेसनने ग्रुंपी कॅटला विकत घेतले हाेते. त्यांनी २०१२ मध्ये एका यूट्यूब व्हिडिओत प्रसिद्धीसाठी स्वत:ला गाेळी मारून घेतली हाेती. हा व्हिडिओ १५.७ दशलक्ष लाेकांनी पाहिला हाेता. शुक्रवारी बुंडेसनच्या कुटुुंबीयांनी ग्रुंपीच्या निधनाची घोषणा केली. ग्रुंपीचा मृत्यू यूरिनल इन्फेक्शनमुळे झाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...