आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसुतीच्या 5 महिने अगोदर जन्मली जगातील सर्वात लहान मुलगी, सफरचंदाच्या आकारापेक्षाही लहान होते शरीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या सॅन डिएगो येथे एका रूग्णालयात गुरुवारी जगातील वजन आणि शरीराने सर्वात लहान नवजात बाळ जिवंत असल्याचा खुलासा करण्यात आला. बेबी सेबाईचे जन्मावेळीचे वजन फक्त 245 ग्राम होते आणि शरीर सफरचंदाच्या आकारापेक्षाही लहान होते. अमेरिकेच्या आयओवा विद्यापीठाच्या 'टाइनिएस्ट बेबीज रजिस्ट्री' मध्ये जगातील सर्वात लहान जिवंत नवजातची नोंद करण्यात आली. 


सॅन डिएगोचे शार्प मॅरी बिर्च रूग्णालयाच्या मते, सेबाईचा जन्म डिसेंबर 2018 मध्ये झाला होता. यानंतर पाच महिन्यांपर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते. सध्या तिची प्रकृती स्थिरावल्यामुळे तिला घरी सोडण्यात आले. सेबाईचा जन्म गर्भावस्थेच्या चोवीसाव्या आठवड्यात झाला. एक सामान्य गर्भावस्था 9 महिन्यांची असते. दरम्यान डॉक्टरांनी तिच्या वडिलांनी सांगितले होते की, मुलीला पाहण्यासाठी त्यांच्याकडे फक्त एक तासाचा अवधी आहे. कारण इतके कमी वजनाचे मुले जिवंत राहण्याची शक्यता कमीच असते. 

 

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वाचली मुलगी

रूग्णालयाने मुलीच्या आईचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, मुलगी फक्त तासभर जिवंत राहण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलगी अगोदर 2 तास, नंतर काही दिवस आणि यानंतर काही आठवड्यांपर्यंत जिवंत राहिली. डॉक्टर तिच्या जिवंत राहण्याबाबत कोणताही ठोस दावा करत नव्हते. 

 

तळहातावर सहज सामावत होती मुलगी
रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये पाच महिने ठेवल्यानंतर तिचे वजन 2.2 किलोपर्यंत पोहोचले. यानंतर डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. रूग्णालयात सेबाईची काळजी घेण्याऱ्या नर्सच्या मते, मुलीचे जिवंत राहणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दूसरी नर्स एमाने सांगितले की, सेबाई जन्मावेळी इतकी लहान होती की, ती पलंगावर दिसत नव्हती. ती तळहातात सहजरित्या मावत होती. 


जपानमध्ये जन्मले होते 258 ग्राम वजनाचे मूल
यापूर्वी ऑक्टेबर 2018 मध्ये टोक्योच्या एका रूग्णालयात सर्वात कमी वजनाचे मूल जन्मले होते. जन्माच्या वेळी त्याचे वजन 258 ग्राम होते. 6 महिन्यांच्या उपचारानंतर त्याचे वजन 3 किलो झाले. यापूर्वी हा रेकॉर्ड जपानच्या एका मुलाच्या नावे होते. त्याचे जन्मावेळी 268 ग्राम वजन होते. 

बातम्या आणखी आहेत...