Yoga day Special / आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधून जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांनी केला योगा

संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाता अभ्यास करताना दिसत आहेत

दिव्य मराठी वेब

Jun 20,2019 04:36:00 PM IST

हेल्थ डेस्क- आंतराष्ट्रीय योगा दिवस 2019 यावेळी 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाता अभ्यास करताना दिसत आहेत. यात नागपूरही कमी नाहीये. जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे या महिलेने उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात आंतराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे हिच्यासह योगासने करून योग संदेश दिला.


योगा का करावा ?
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचे ध्येय आणि ते कसे साध्य करायाचे ते हे निश्‍चित करत असतो. आपल्या जीवनरूपी प्रवासात ध्येयपूर्ती करण्यासाठी कोणते अडथळे येतात आणि पतंजली योगसूत्राद्वारे ते कसे दूर करता येतात, हे आपण पाहू. आपल्याकडे एखादे वाहन असेल तर काही ठराविक कालावधीनंतर आपण त्याची दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग करतो. कशासाठी तर ऐनवेळी आपणास धोका होऊ नये आणि आपला प्रवास सुखकारक व्हावे म्हणून. निर्जीव असलेल्या वाहनांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी काळजी आपल्या सजीव शरीराची खरोखरच आपण घेत असतो का? नाही. म्हणूनच अचानक मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग आणि आपण याचा काही तरी संबंध आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊ या. मनुष्य पृथ्वीतलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. पण आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण आपले आरोग्य कसे चांगले राहील? याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

X
COMMENT