आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Worldwide Praised ISRO, Landing A Soft Landing 10 Times Faster Than A Plane Was Not Easy

संपूर्ण जगाने केले इस्रोचे कौतुक, विमानापेक्षा 10 पट वेग असलेल्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणे सोपे नव्हते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'चंद्रयान-2' चा इस्रो केंद्राशी संपर्क तुटल्यानंतरही जगभरात, भारतीय अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांचे खूप कौतुक होत आहे. अमेरिकेतील वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाइम्स'पासून ते 'वॉशिंगटन पोस्ट' आणि ब्रिटिश वृत्तपत्र 'बीबीसी'पासून 'द गार्जियन'पर्यंत सर्वत्र 'चंद्रयान-2' ची चर्चा सुरू आहे. या मिशनला आतापर्यंतचे सर्वात महत्वाकांक्षी मिशन संबोधले.

> 'न्यूयॉर्क टाइम्स'ने शनिवारी भारतीय मिशनचे कौतुक करत लिहीले की, "भारत पहिल्या प्रयत्नात चंद्रावर लँडिग करण्यात यशस्वी नाही होऊ शकला. पण त्यांच्या इंजीनिअरिंग कौशल्य आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अंतराळ विकास कार्यक्रमाने त्यांच्या जागतिक महत्वाकांक्षा जगापुढे आल्या. 'चंद्रयान-2'च्या अपयशामुळे चंद्रावर लँड करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव येण्यासाठी थोडा वेळ लागून शकतो." 
> 'वॉशिंगटन पोस्ट'ने लिहीले, "भारतासाठी हे मिशन राष्ट्रीय गौरवाचा विषय होता." 
> 'द गार्जियन'ने फ्रांसची स्पेस एजंसी सीएनईएसकडून सांगितले की, "भारत त्या ठिकाणी जात आहे, ज्या ठिकाणी 20, 50, किंवा 100 वर्षानंतर मानव जाऊन वसणार आहे."
> फ्रेंच वृत्तपत्र 'ली मोन्ड'ने लिहीले, "शास्त्रज्ञांनुसार, चंद्रावर पाठवलेले 45% मिशन यशस्वी झाले आहेत. कोणत्याही मानवाच्या मदतीशिवाय सॉफ्ट लंडिंग खूप अवघड असते." 

इस्रोचा प्रयत्न येणाऱ्या मिशनसाठी कामी येईल- नासा एस्ट्रोनॉट
अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाचे माजी अंतराळवीर जॅरी लिनेंजरने चंद्राच्या जमिनीवर 'चंद्रयान-2' च्या विक्रम मॉड्यूलची सॉफ्ट लँडिंग करणाच्या भारताच्या प्रयत्नाला 'साहसि प्रयत्न' म्हटले, सोबतच त्यांनी म्हटले की, यातून येणाऱ्या मिशनसाठी खूप माहिती कामी येईल.