आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Worldwide, There Are 30 Million Children's Schools Drowned, Now The Side Effects Of Infection In Countries Other Than China

जगभरात ३० कोटी मुलांची शाळा बुडतेय, १४ देशांमधील शाळांना टाळे; आता चीनपेक्षा इतर देशांत संसर्गाचे दुष्परिणाम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रान्सच्या १२० शाळांना टाळे, नऊ देशांनी गरजेनुसार दिली सुटी
  • जगभरात : वर्ल्डमीटर डॉट इन्फोचा अहवाल : ५७ हजार लोक उपचारांनंतर झाले बरे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा परिणाम आरोग्यावर तर होत आहेच, त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचेही नुकसान होत आहे. गुरुवारी नवी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इटलीने देखील देशभरातील शाळांना सुटी दिली आहे. फ्रान्सनेही १२० शाळा बंद केल्या. युनेस्कोच्या ताज्या अहवालानुसार जगभरात संसर्गाच्या भीतीने ३० कोटी मुले शाळेला जाऊ शकत नाहीत. १४ देशांतील शाळा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. ९ देशांनी आपल्या स्थितीनुसार सुट्या दिल्या आहेत. युनेस्कोचे प्रमुख ऑड्रे अजोले म्हणाले, अशीच परिस्थिती राहिल्यास मुलांच्या शिक्षणांवर त्याचा परिणाम होईल. संशोधन : दोन प्रकारचा व्हायरस, संसर्गात वाढ
 
चीनच्या संशोधकांच्या मते १४९ ठिकाणांहून कोरोना व्हायरसच्या १०३ जीनोमचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर कोरोनाचे एल व एस टाइप असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. एस प्रकारातील कोरोनामुळे जगभरात संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. एस टाइपचा कोरोना विषाणू एल टाइपमधून निर्माण झाला आहे. वुहानमध्ये ७ जानेवारीपूर्वी एल टाइपचा व्हायरस अस्तित्वात होता. नंतर तो एस टाइपमध्ये रूपांतरित झाला. एस प्रकारातील विषाणूमुळे कोरोनाचा संसर्ग अचानक वेगाने वाढला. 
 

गुड न्यूज : संशोधक म्हणाले- भारतीयांनी चिंता करू नये 
 
> भारतातील वरिष्ठ संशोधक व रॉयल सोसायटी लंडनचे संशोधक गगनदीप कांग म्हणाले, भारतातील लोकांनी चिंता करण्याची गरज नाही. गरज भासेल तेव्हाच चाचणी करून घ्यावी. संसर्ग वाढणाऱ्या ठिकाणांची प्रशासनाने माहिती दिली पाहिजे. 

> विषाणूची दोन लक्षणे माणसात पाेहोचू लागली आहेत, असा दावा चीनच्या संशोधकांनी केला आहे. त्यातून संसर्ग होतोय. त्यातून विषाणूच्या विकासाला समजून घेण्यास मदत मिळेल. लवकरच त्यावर उपचार शोधला जाऊ शकतो.


> इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथील बेथलहॅमच्या चर्चला संसर्गाच्या भीतीने बंद करण्यात आले आहे. 
> जागतिक बँकेने विकसनशील देशांना कोरोनाशी लढण्यासाठी ८४ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.
> कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन ७ मार्चपासून नागरिकांसाठी बंद.
> इराणमध्ये एक महिन्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, संशोधन संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
> पाकिस्तान सुपर लीगचा सामना रद्द होऊ नये यासाठी पाकिस्तान संसर्गाची प्रकरणे दडवत आहे. 
> जेम्स बाँड ‘नो टाइम टू डाय’चे प्रदर्शन आता एप्रिलऐवजी नोव्हेंबरमध्ये होणारफेब्रुवारीत जगाच्या तुलनेत १८ पटीने जास्त प्रकरणे चीनमध्ये, मार्चमध्ये १८ पट जास्त जगभरात


चीनच्या तुलनेत आता जगातील उर्वरित देशांत विषाणू बाधा वेगाने होत आहे. जानेवारी अखेर व फेब्रुवारीच्या  चीनमध्ये बाधा खूप जास्त होती. ४ फेब्रुवारीला बाकी देशांत २२१ नवीन प्रकरणे होती. परंतु, चीनमध्ये नवीन प्रकरणांची संख्या ३ हजार ८८७ होती. म्हणजेच १८ पट जास्त. ४ मार्चला परिस्थिती बदलली. बुधवारी चीनमध्ये नवीन १२० प्रकरणे समोर आली. बाकी देशांत २१०३ प्रकरणे होती. म्हणजेच १८ पट जास्त.बातम्या आणखी आहेत...