आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुद्राक्षाच्या माळेने करावा हनुमान मंत्राचा जप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी हनुमान मंत्राचा जप केल्याने ते अतिप्रसन्न होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमान मंत्राचा जप करण्याचा एक विशेष विधी आहे. त्यानुसार मंत्राचा जप केल्याने शुभफळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमान मंत्र आणि जप विधी प्रकार... 


मंत्र
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।


या विधीनुसार करावा मंत्र जप
1. मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून एक लाल कपड्यावर हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.


2. हनुमानाला गुलाल, लाल फुल, नारळ अर्पण करावे. त्यानंतर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. जप पूर्ण होईपयंत दिवा चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.


3. त्यानंतर मंत्र काप सुरु करून कमीत कमी 5 माळ जप करावा. हनुमान मंत्राचा जप रुद्राक्ष माळेने करावा.


4. दररोज जप करणे शक्य नसल्यास मंगळवारी आणि शनिवारी या मंत्राचा जप अवश्य करावा.

बातम्या आणखी आहेत...