Home | Jeevan Mantra | Dharm | Worship Tips and About Hanuman

हनुमानाचे 6 प्रकारचे फोटो, आपल्या इच्छेनुसार घरात लावावा कोणताही एक

रिलिजन डेस्क | Update - Aug 24, 2018, 10:50 AM IST

कलियुगात हनुमानाला लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते. हनुमानाच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आणि प्रतिमा सर्वांनीच पहि

 • Worship Tips and About Hanuman

  कलियुगात हनुमानाला लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते. हनुमानाच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आणि प्रतिमा सर्वांनीच पहिल्या असतील. शास्त्रानुसार हनुमानाच्या वेगवेगळ्या स्वरुपांची उपासना केल्यास वेगवेगळे फळ प्राप्त होतात. हनुमानाचे स्मरण केवळ सुखी जीवनासाठी आणि संकटातून मुक्त होण्यासाठी केले जात नाही तर, वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानाचे विविध रूप पूजनीय आहेत. येथे जाणून घ्या, हनुमानाचे विविध स्वरूप आणि त्यापासून कोणकोणते लाभ होतात...


  वीर हनुमान -
  वीर हनुमानामध्ये साहस, बळ, पराक्रम, आत्मविश्वास दिसून येतो. यामुळे सर्व कार्य पूर्ण होतात. वीर हनुमानाची पूजा केल्याने भक्ताला साहस प्राप्त होते.


  दास हनुमान -
  दास हनुमानाची उपासना सेवा आणि समर्पणाच्या भावनेशी जोडते. धर्म, कार्य आणि नात्यांच्या प्रती समर्पण आणि सेवेच्या इच्छेने दास हनुमानाची पूजा करावी. व्यक्तीला कुटुंब आणि कार्यक्षेत्राच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या लोकांचे विशेष प्रेम प्राप्त होते.


  भक्त हनुमान -
  राम भक्तीमध्ये लीन असलेल्या भक्त हनुमानाची उपासना एकाग्रता, आत्मविश्वास प्रदान करणारी आहे, म्हणजेच जीवनातील ध्येय पूर्ण करण्यामध्ये येणार्‍या अडचणी दूर करणारी आहे.


  दक्षिणमुखी हनुमान -
  दक्षिण काळाची दिशा मानली जाते. हनुमानाला रुद्र अवतार मानले जाते, जो काळ नियंत्रक आहे. यामुळे दक्षिणमुखी हनुमानाची साधना केल्यास काळ, भय, संकट, आणि चिंतेचा नाश होतो.

 • Worship Tips and About Hanuman

  सूर्यमुखी हनुमान -
  शास्त्रानुसार सूर्यदेव हनुमानाचे गुरु आहेत. सूर्योदय पूर्व दिशेला होऊन सर्व दिशेला प्रकाशमान करतो. सूर्य आणि प्रकाश क्रमश: गती आणि ज्ञानाचे प्रतिक आहे. सूर्यमुखी हनुमानाची उपासना केल्यास ज्ञान, विद्या, ख्याती, मान-सन्मान प्राप्त होतो.

 • Worship Tips and About Hanuman

  उत्तरमुखी हनुमान -
  उत्तर दिशा देवतांची मानली जाते. यामुळे शुभ आणि मंगल कार्याची इच्छा उत्तरमुखी हनुमान उपासनेने पूर्ण होते.

Trending