आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजन कर्मामध्ये या भांड्यांचा वापर आहे वर्ज्य, मिळत नाही पूजेचे पुण्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमितपणे देवाची पूजा केल्याने मोठमोठ्या अडचणींमधून व्यक्तीला मुक्ती मिळते. पूजन कर्मामध्ये विविध प्रकारच्या भांड्यांचा वापर केला जातो. विशेषतः कलश, पूजेचेत ताट, वाटी, दिवा इ. हे भांडे कोणत्या धातूचे असावेत, या संदर्भात शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. काही धातू पूजेमध्ये वर्ज्य सांगण्यात आले आहेत. वर्जित धातूने पूजा केल्यास पूजेचे पूर्ण पुण्य आणि फळ प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद  पं. सुनील नागर यांच्यानुसार पूजेसाठी कोणकोणते धातू शुभ आहेत आणि कोणते अशुभ...

# शुभ धातू 
> शास्त्रानुसार वेगवेगळे धातू वेगवेगळे फळ प्रदान करतात. सोने, चांदी, पितळ, तांब्याच्या भांड्यांचा वापर पूजेसाठी शुभ मानण्यात आला आहे.

> मान्यतेनुसार या धातूने पूजा केल्यास देवी-देवता लवकर प्रसन्न होतात.

> पूजेमध्ये सोने, चांदी, तांबे, पितळेच्या भांड्याचा वापर करावा. हे धातू आपल्या त्वचेसाठीसुद्धा लाभदायक राहतात.

> आयुर्वेदानुसार या धातूच्या नेहमी संपर्कात राहिल्यास विविध आजारांपासून मुक्ती मिळते.

# अशुभ धातू 
> पूजेमध्ये लोखंड, स्टील आणि ऍल्युमिनिअम धातू वर्ज्य सांगण्यात आले आहेत.

> धार्मिक कार्यामध्ये लोखंड, स्टील आणि ऍल्युमिनिअम धातूला अपवित्र धातू मानण्यात आले आहे. यामुळे या धातूंच्या मूर्ती बनवल्या जात नाहीत.

> लोखंडाला हवा, पाण्याने गंज लागतो. पूजा करताना देवतांच्या मूर्तीला हाताने स्नान घातले जाते, अशावेळी गंज लागलेल्या गोष्टीचा आपल्या त्वचेवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे अशा मूर्ती बनवल्या जात नाहीत.

बातम्या आणखी आहेत...