Home | Jeevan Mantra | Dharm | Worship Tips In marathi

पुजेशी संबंधित या 8 गोष्टी चुकूनही जमिनीवर ठेवू नयेत, अन्यथा पूजा होईल निष्फळ

रिलिजन डेस्क | Update - Aug 24, 2018, 11:17 AM IST

पूजा-पाठ करताना शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास पूजा यशस्वी होते आणि आपण अडचणींपासून दूर राहतो.

 • Worship Tips In marathi

  पूजा-पाठ करताना शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास पूजा यशस्वी होते आणि आपण अडचणींपासून दूर राहतो. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, पुजेशी संबंधित 8 गोष्टी चुकूनही थेट जमिनीवर ठेवू नयेत. हे वैष्णव पुराण आहे. यामध्ये चार खंड आहेत. पहिला खंड ब्रह्म खंड, दुसरा प्रकृती खंड, तिसरा गणपती खंड आणि चौथा श्रीकृष्ण खंड. या पुराणामध्ये पुजेशी आणि सुखी जीवनाशी संबंधित खास सूत्र सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणकोणत्या गोष्टी थेट जमिनीवर ठेवू नयेत...


  पहिली गोष्ट आहे दिवा
  दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावेत किंवा लाकडाच्या पाटावर दिवा ठेवावा.


  दुसरी गोष्ट आहे सुपारी
  पूजेमध्ये सुपारी एखाद्या नाण्यावर ठेवावी.


  तिसरी गोष्ट आहे शाळीग्राम
  शाळीग्राम एका स्वच्छ रेशमी कपड्यावर ठेवावा.


  चौथी गोष्ट आहे मणी
  तुम्ही पूजेमध्ये एखाद्या मणी किंवा रत्न ठेवणार असाल तर तो एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवावा.


  पाचवी गोष्ट आहे देवी-देवतांच्या मूर्ती
  थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर देवी-देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले गेले आहे.


  सहावी गोष्ट आहे यज्ञोपवीत (जानवे)
  जानवे स्वच्छ कपड्यावर ठेवावे, कारण हे देवतांना मुख्यतः अर्पण केले जाते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टींविषयी...

 • Worship Tips In marathi

  सातवी गोष्ट आहे देवी-देवतांचे वस्त्र आणि आभूषण 
  जमिनीवर वस्त्र ठेवल्याने ते अस्वच्छ होतात. देवाला नेहमी पवित्र वस्त्र अर्पण करावेत.

 • Worship Tips In marathi

  आठवी गोष्ट आहे शंख
  शंख लाकडाच्या चौरंगावर किंवा स्वच्छ कपड्यावर ठेवावा.


  या सर्व गोष्टी कधीही थेट जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू खाली ठेवण्यापूर्वी एखादा स्वच्छ कपडा अंथरावा किंवा उंच स्थानावर ठेवाव्यात. या वस्तू थेट जमिनीवर ठेवणे अशुभ मानले जाते.

Trending