आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात भाजपचे ऑपरेशन कमळ थांबवणारच! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस भाजपच्या मंसूब्यांपासून आधीच सतर्क
  • भाजप सेनेला आमच्यासोबत येण्यापासून रोखतेय

मुंबई - राज्यात भाजपचे ऑपरेशन कमळ थांबवणारच असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. भाजपकडून सरकार स्थापनेसाठी आमदारांची जमवा-जमव आणि पक्षातून फोडण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. काँग्रेस यासंदर्भात आधीच सतर्क असल्याचे चव्हाण म्हणाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट मंगळवारी लागू करण्यात आली. त्यानंतरही सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूच आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहेत.

भाजप शिवसेनेला आमच्यासोबत येण्यापासून रोखतेय -चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला, की शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्यापासून भाजप रोखण्याचे प्रयत्न करत आहे. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. काँग्रेसचे नेते ऑपरेशन लोटस संदर्भात सतर्क आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, नारायण राणे यांनी मंगळवारीच एक विधान करून राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकार स्थापनेची कामे सुरू करण्यास सांगितले असा दावा राणे यांनी केला. तसेच सत्ता स्थापित करण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सध्या पक्षांतर्गत बैठका घेत आहे. त्यामध्ये किमान समान कार्यक्रमावर एकमत मिळवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...