Home | Sports | Other Sports | wozanika win tennis tournament

वोझानिकला ब्रुसेल्स ओपनचे विजेतेपद

Agency | Update - May 23, 2011, 01:30 PM IST

वोझानिकने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या पेंग शुईला २-५, ६-३, ६-४ गुणांनी पराभवाची धूळ चारत ब्रुसेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला.

  • wozanika win tennis tournament

    ब्रुसेल्स - इटालियन ओपनचे अजिंक्यपद पटकावणारी आघाडीची टेनिसपटू वोझानिकने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या पेंग शुईला २-५, ६-३, ६-४ गुणांनी पराभवाची धूळ चारत ब्रुसेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला.

    आठवडाभरात वोझानिकने शानदार सुवर्ण कामगिरीचा योग साधला. बुसेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी महिला एकेरीत वोझानिक विरुद्ध पेंग यांच्यात अटीतटीची लढत झाली. पहिल्या सेटवर वोझानिकच्या आक्रमणाला व्यवस्थित परतावून लावत पेंगने ६-२ गुणांनी बाजी मारत आघाडी घेतली होती. त्यानंतर दुस:या सेटवर आघाडीच्या आव्हानाला मोडीत काढण्यासाठी वोझानिकने शानदार सुरुवात केली. कोर्टवर ताबा मिळवून वोझानिकने ६-३ गुणांनी बाजी मारून आघाडीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या निर्णायक लढतीला अधिकच रंगत चढली.

    विजेतेपदाच्या स्पर्धेत तुल्यबळ दोन्ही टेनिसपटूंनी आक्रमक खेळी केली. अखेर, तिसऱ्या निर्णायक सेटवर ६-४ गुणांच्या आघाडीने वोझानिकने पेंगला पराभवाचा धक्का देत विजेतेपदाचा बहुमान पटकावला.

Trending