आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wrap Up Of Ranveer Sing Starer Jayeshbhai Jordaar And First Look Of Upcoming Film Suraj Pe Mangal Bhari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जयेशभाई जोरदार'च्या रॅपअपविषयी रणवीर म्हणाला - 'अपना टेम आएगा ने', डिझेल इंजिनवरवर शूट झाला 'सूरज पे मंगल भारी'चा सीन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ही माहिती स्वतः रणवीरने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन दिली आहे. दुसरीकडे मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांझ आणि फातिमा सना शेख यांनी 'सूरज पे मंगल भारी' च्या सेटवरून पहिला लूक रिलीज केला आहे. ज्याचे शूटिंग मुंबईत सीएसएमटी येथे झाले आहे.

'सूरज पे मंगल भारी'चा फर्स्ट स्टिस

अभिषेक शर्मा यांनी त्यांच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटाचे मुंबईतील सीएसएमटीवर दोन दिवस चित्रीकरण केले. दिग्दर्शकाने सीक्वेन्ससाठी 90 च्या दशकातील डिझेल इंजिन भाड्याने घेतले. दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसांझ यांच्यावर चित्रपटातील एक महत्त्वाचे दृश्य चित्रीत करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली.

खरं तर हे चित्रीकरण रामोजी फिल्म सिटीमध्ये होणार होते. परंतु नंतर आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दरम्यान दोन दिवस हे चित्रीकरण झाले. या शूटसाठी रेल्वेने विशेष ट्रेन दिली जी डिझेल इंजिनने सुसज्ज होती.