आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद होण्यापूर्वी संदीप सिंग यांनी गाजवला पराक्रम, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, डोक्यात गोळी लागली आणि सर्वकाही संपले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - लान्स नायक संदीप सिंह. सर्जिकल स्ट्राइकचे हिरो, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना ते शदीह झाले. पण शहीद होण्यापूर्वी त्यांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. आर्मीच्या स्पेशल फोर्समध्ये त्यांचा समावेश होता.  संदीपने सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानात घुसून शत्रूला संपवले होते. 


शहीद होण्यापूर्वी दाखवले शौर्य 
मीडिया रिपोर्ट्सनुसार संदीप सिंह 4 पॅरा कमांडो टीममबरोबर तंगधार सेक्‍टरमध्ये सर्चिंग टीमला लीड करत होते. त्याचवेळी त्यांना काहीतरी संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. ते त्यांच्या टीमबरोबर पुढे गेले. पण दहशतवादी दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक सर्चिंग टीमवर अटॅक केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार सुरू केला. 


गोळी लागल्यानंतरही लढत राहिले संदीप 
मीडिया रिपोर्ट्सनुसार लान्सनायक संदीप सिंह यांनी दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. एकापाठोपाठ एक तीन दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला. यादरम्यान गोळी लागल्याने ते जखमी झाले होते, पण त्यांनी माघार घेतली नाही. सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. दहशतवाद्यांशी लढत असतानाच एक गोळी त्यांच्या डोक्यावर लागली आणि त्यात ते शहीद झाले. सर्चिंगमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...