आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीपटू बबिता फोगट आता उतरणार राजकारणाच्या ‘आखाड्यात’; भाजपकडून लढवणार निवडणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - कुस्तीमध्ये आपल्या डावपेचांच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोधी कुस्तीपटूंना चितपट करणारी कुस्तीपटू बबिता फोगट आता राजकारणाच्या आखाड्यात उतरत आहे. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत बबिता भारतीय जनता पक्षाच्या वतीने रिंगणात उतरण्याचे संकेत तिने स्वत: दिले आहेत. राजकारणाच्या आखाड्यात उतरून समाजातील समस्या आणि वाईट गोष्टींविरोधात ती लढणार आहे.
क्रीडा पत्रकार सौरव दुग्गल यांच्या ‘अखाडा‘ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पत्रकारांशी वार्तालाप करताना बबिता फोगट हिने तिच्या पुढील वाटचालीबद्दल सांगितले. बबिता फोगटने सांगितले की, हरियाणा पोलिस दलातील उपनिरीक्षक पदाचा तिने राजीनामा दिला असून  भारतीय जनता पक्षात सामील झाली आहे. आता राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक वाईट रीती, समस्या यांच्याशी दोन हात करणार आहे. तिने स्पष्ट केले की, आम्ही लढवय्ये आहोत आणि नेहमीच लढण्यासाठी तयार असतो. आधी कुस्तीच्या आखाड्यात विरोधकांना चितपट करत देशाची सेवा केली आहे. आता राजकारणाच्या माध्यमातून लोकांचे विविध मुद्दे उचलत देश आणि समाजात बदल करण्यासाठी लढणार.

खेळानंतर राजकारणात उतरून नवीन डाव सुरू करण्यासाठी तिने भारतीय जनता पक्षाचीच का निवड केली, या प्रश्नावर बबिता म्हणाली की, तिची इच्छा राष्ट्रवादी पक्षात सहभागी व्हायची होती आणि भाजपपेक्षा जास्त चांगला राष्ट्रवादी पक्ष इतर कोणताही दिसला नाही. तिने सांगितले की, ज्या पद्धतीने ती कुस्तीच्या आखाड्यात उतरून देशाचा सन्मान तिने वाढवला त्याच त्वेषाने राजकारणात येत देशाची सेवा तिला करायची आहे.
 
राजकारणात यायचा निर्णय सर्वस्वी तिचा आहे. सरकारी नोकरी करत असताना सामाजिक विषयांवर आवाज बुलंद करता येत नाही, यामुळे तिने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कुटुंब सुमारे २५ वर्षांपासून राजकारणाशी संबंधित आहे. आई व काका गावाचे सरपंच होते. यामुळे लहानपणापासूनच व समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. हा वारसा पुढे चालवण्यासाठी राजकारणात यायचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...