Sports / कुस्तीपटू बजरंग पूनियाला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कार जाहीर


रेसलिंग फेडरेशनने या प्रतिष्ठीत अवॉर्डसाठी पूनियासोबत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचेही नाव दिले होते

दिव्य मराठी वेब

Aug 16,2019 06:15:00 PM IST

स्पोर्ट डेस्क- भारतीय स्टार कुस्तीपटू बजरंग पूनियाला "राजीव गांधी खेलरत्न" पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. बजरंगला कुस्तीत चांगले प्रदर्शन केल्याबद्दल हा पुरस्कार मिळत आहे.


भारतीय कुस्ती महासंघ(डब्ल्यूएफआय) ने या प्रतिष्ठीत अवॉर्डसाठी बजरंग पूनिया सोबत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली होती. पूनियाने काही दिवसांपूर्वी "तबिलिसी ग्रां प्री"मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने ईरानच्या पेइमान बिबयानीला पराभूत करुन 65 किलोग्राम वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली होती.


या वजनी गटातील नंबर-1 खेळाडू असलेल्या बजरंगने चीनमध्ये आयोजित आशिया चँपियनशिपमध्ये विजय मिळवून आशिया खंडातील आपले वर्चस्व दाखवून दिले होते. बजरंगने मागच्या वर्षी आशिया खेळात आणि कॉमनवेल्थ खेळात सुवर्ण जिंकले होते. मागील वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला खेळाडू मीराबाई चानूला हा पुरस्कार मिळाला होता. पहिला खेळरत्न बुद्धबळ खेळाडू विश्वनाथ आनंदला 1991-92 मध्ये मिळाला होता.

X
COMMENT