आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After Deepika Padukone And Priyanka Chopra Now Wrestler Vinesh Phogat Going To Marry On 13 December

दीपिका पदुकोण अन् प्रियंका चोप्रानंतर पहिलवान विनेश फोगट घेणार 7 फेरे, लग्नाची तारीखही ठरली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्टस डेस्क - दीपिका पदुकोण अन् प्रियंका चोप्रानंतर आता गोल्ड मेडलिस्ट पहिलवान विनेश फोगाट लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाची तारीखही ठरली आहे.  आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णाला गवसणी घालणाऱ्या पहिलवान विनेश फोगाट 13 डिसेंबरला पहिलवान सोमवीर राठीसोबत विवाहबद्ध होईल. रिसेप्शन 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हे लग्न हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यात बलाली गावात होणार आहे. विनेशने रविवारी आपल्या लग्नाचे निमंत्रण कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना दिले. 

 

विनेशचे गाव बलालीमध्ये 12 डिसेंबर रोजी गावकऱ्यांसोबतच नातेवाइकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर संध्याकाळी तेथेच संगीत सेरेमनीही होईल. दुसऱ्या दिवशी 13 डिसेंबर रोजी सोमवीर राठी जिंद जिल्ह्यातील त्यांचे गाव बखता खेडा येथून वऱ्हाड घेऊन बलालीला पोहोचतील. संध्याकाळी 8.00 वाजता विनेश फोगाट लग्न होऊन सासरी जाण्यासाठी निघेल.

 

ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने एशियन गेम्सदरम्यान इन्स्टाग्रामवर आपला आणि जीवनसाथी सोमवीर राठी यांचा फोटो शेअर करून लग्नाची माहिती जाहीर केली होती. एशियन गेम्सवरून परतल्यावर एअरपोर्टवर सोमवीर राठीने विनेश फौगाटला साखरपुड्याची अंगठी घातली होती आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर लग्न करणार असल्याचे म्हटले होते.

 

विनेश भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहे. दुसरीकडे पहिलवान सोमवीरही रेल्वेमध्येच नोकरी करतात. ते सध्या राजस्थानात टीटीईच्या पदावर आहेत. विनेश आणि सोमवीर यांच्यात रेल्वेतील नोकरीदरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सोमवीर राठीने राष्ट्रीय कुस्तीत कांस्य पदक जिंकल्यानंतर रेल्वेत नोकरी स्वीकारली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...