आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकासोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतला डच्चू; साहा आणि अश्विनला संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - भारत-दक्षिण आफ्रिका दरम्यान 3 कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनम येथे बुधवारपासून खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी ऋद्धिमान साहा, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला. तर ऋषभ पंतला मात्र डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी ऋद्धिमान साहाला घेतले असल्याचे कर्णधार विराट कोहलीने सांगितले. सध्या माझ्यासाठी तो जगातील उत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याचे तो म्हणाला. 
 
साहाने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर व्हावे लागले. यानंतर त्याने आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. मात्र या स्पर्धेदरम्यान तो पुन्हा जखमी झाला होता. 
 

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी