आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीने चित्रपट बंद केला, त्यानंतर \'सत्ता परिवर्तन\' नॉवेलच्या रूपात समोर आला जनतेचा \'आक्रोश\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दुष्यंत कुमार यांची एक गझल आहे- ‘सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं/ मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए!’ परंतु याच धर्तीवर समोर आलेली एक कादंबरी ‘सत्ता परिवर्तन’ हाहाकार माजवू शकते. सध्या देश विचित्र राजकारणाला सामोरे जात आहे. परंतु ही कादंबरी जनतेच्या क्रोधाला जागृत करू शकते. राजकारणी आणि गुन्हेगारांची पोलखोल उघड करणारे वास्तव मांडणाऱ्या या कादंबरीची कथा खऱ्या घटनांच्या अवतीभवती फिरते, यामध्ये तरुणांचे आंदोलन केंद्रस्थानी आहे.


- हे नॉवेल हिंदू युग्मने पब्लिश केले असून अॅमेझॉन प्रमोट करत आहे. जर्नलिस्ट अमिताभ बुधौलिया यांचे हे पहिले नॉवेल आहे. याच कथा आणि टायटलवर एक चित्रपटही तयार करण्यात आला होता. परंतु नोटबंदी नंतरच्या आर्थिक संकटात चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. या चित्रपटामुळे मीडियात काही वादही समोर आले होते.


- कथेमध्ये भैया राजा नावाची मुख्य भूमिका एका बाहुबली आमदाराची आहे. ही भूमिका उत्तरप्रदेशचे बाहुबली नेता रघूराजप्रताप सिंह उर्फ भैया राजाशी मिळतीजुळती आहे. चित्रपटात ही भूमीका चर्चित अभिनेता पियुष सुहाने यांनी साकारली होती आणि हे हुबेहूब भैया राजाप्रमाणे दिसतात. परंतु लेखक हा केवळ एक योगायोग असल्याचे मानतात.


- लेखक सांगतात की, हे नॉवेल निश्चितपणे सत्तेमध्ये बसलेल्या काही नेत्यांमुळे बदनाम झालेल्या राजकारणाचे सत्य सांगते. परंतु हा फक्त एक संयोग आहे की यामधील काही पात्र वास्तविक जीवनातील काही गोष्टींशी जुळतात. 
- प्रत्येक लेखकाचा स्वतःचा एक वेगळा विचार असतो. माझा उद्देश हाच आहे की, लेखणीच्या माध्यमातून देश-समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध जनतेला उभे करून त्यांच्यामधील आक्रोश जागृत करावा. विशेषतः युवा शक्तीला जागृत करायचे आहे परंतु सत्ता विरोधी काहीही करण्याचा हेतू नाही.
- हे सत्य आहे की, सत्तेमध्ये बसलेल्या काही लोकांविरुद्ध आंदोलन उभे करणे आवश्यक आहे. जे आपल्या स्वार्थासाठी देश विकण्यासाठी निघाले आहेत. जनतेला चुकीचा मार्ग दाखवत आहेत त्यांचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. काही राजकारणी गरिबी, भूक, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आतंकवाद यासारख्या समस्या नष्ट होऊ देत नाहीयेत.


- या नॉवेलवर साहित्य आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित विविध लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कथाकार तेजेंद्र शर्मा लिहितात - 'या नॉवेलमधून राजकारणात पैसा आणि पॉवरचा दुरुपयोग कशाप्रकारे होतो हे दिसून येते.
- गॅंग ऑफ वासेपूर, स्त्री आणि मिर्झापूर यासारख्या चित्रपटामुळे चर्चेत आलेले अभिनेता पंकज त्रिपाठी लिहितात की, 'हे नॉवेल देशातील राजकारण आणि सामाजिक सत्य समोर आणते.'
- प्रसिद्ध जर्नलिस्ट निधीश त्यागी लिहितात की- नॉवेलमधील संवाद शैली चित्रपटातील दृश्य निर्माण करतात'
- बवंडर, वेलडन अब्बा, वेलकम टू सज्जनपुर यासारख्या चित्रपटांच्या कथा लिहिणारे अशोक मिश्र लिहितात की, 'या नॉवेलमधील प्रत्येक पात्र राजकारणात घुसलेल्या वाईटावर तीक्ष्ण व्यंग करते.'
- कवी एहसान कुरैशी लिहितात - 'वाचून असे वाटले की सर्वकाही आपल्या जवळपासच घडत चालले आहे'
* प्रसिद्ध फिल्म ऍक्शन डायरेक्टर शाम कौशल लिहितात- 'नॉवेल चित्रपट दृष्टीने लिहिण्यात आले आहे, ज्यामुळे एक-एक दृश्य सजीव दिसेल.'
- प्रसिद्ध कथाकार राजनारायण बोहरे लिहितात - 'तरुणांना समोर ठेवून हे नॉवेल लिहिण्यात आले आहे.'


- नॉवेलची कथा एका सरकारी कॉलेजच्या जमिनीवर षडयंत्र रचून मॉल बांधण्यापासून सुरु होते. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा एक ग्रुप याचा खूप विरोध करतो. त्यामुळे भैया राजा षडयंत्र रचून या विद्यार्थ्यांना नक्षलवादी असल्याचे घोषित करतो.
- नॉवेल सस्पेन्स, थ्रिल आणि ऍक्शनने भरलेले आहे.


- लेखक सांगतात की - 'सर्वात पहिले आम्ही याची फिल्म स्क्रिप्ट तयार केली होती. नंतर ही स्क्रिप्ट नॉवेलमध्ये रूपांतरित करण्यात आली. यामुळेचा याची लेखन शैली पटकथेनुसार आहे. परंतु सर्वात मोठा उद्देश तरुणांना हिंदी लेखनाकडे आकर्षित आणि जागृत करणे असा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...