आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रख्‍यात लेखिका-कवयित्री कविता महाजन यांचे निधन, न्‍यूमोनियामुळे खालावली होती तब्‍येत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वास्तववादी आशय आणि प्रयोगशील लेखनशैलीमुळे नावाजलेल्या प्रसिद्ध साहित्यिक, दैनिक दिव्य मराठीच्या स्तंभलेखिका कविता महाजन (५२) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. न्यूमोनिया झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू हाेते, तिथेच त्यांची प्राणज्याेत मालवली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात कन्या दिशा, वडील असा परिवार आहे. 


कविता यांचा जन्म नांदेडचा. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव स. दि. महाजन यांच्या त्या कन्या. नांदेड व औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. मराठी साहित्य विषयात एमए पदवी घेतली हाेती. 'ब्र' या पहिल्याच कादंबरीने त्या चर्चेत अाल्या. 'दिव्य मराठी'च्या मधुरिमा पुरवणीत जानेवारी २०१७ पासून 'स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास' हा त्यांचा स्तंभ सुरू होता. 'बदलापूरची बखर' हा स्तंभही वर्षभर चालवला. 


मृत्युपत्रानुसार, कविता यांच्यावर धार्मिक अंत्यसंस्कार हाेणार नाहीत. त्यांच्या पश्चात कुठलाही समारंभ, कार्यक्रम घेऊ नये, पुरस्कार देऊ नयेत. परिवाराचा खासगीपणा जपावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली हाेती. त्यानुसार अापण संवेदना mahajandisha93@yahoo.in ई-मेल किंवा पत्राने व्यक्त कराव्यात, असे निवेदन कन्या दिशा यांनी दिले. 

 

बातम्या आणखी आहेत...