आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराज, यू आर इन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौरव गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष होईल. सौरवची कारकीर्द चढ-उताराने भरलेली आहे. त्याच्या ‘अ सेंचुरी इज नॉट इनफ’ या पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणाचे शीर्षकही ‘महाराज, यू आर इन’ असे आहे. ते त्याच्या संघात परतण्यावर आहे. सौरव कसा आहे हे सांगत आहेत त्याच्या याच पुस्तकाचे लेखक गौतम भट्टाचार्य.  

1. जिद्द अशी की...
संघात परतण्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज पोहोचला लहान स्पर्धेत
ही गोष्ट २००८ च्या उन्हाळ्यातील. सौरव  ईडन गार्डनमध्ये सरावासाठी जात होता. त्याला संघातून वगळण्यात आले आहे, असे अचानक कळले. ज्याला प्लेअर ऑफ द इयर आणि अलीकडेच सर्वोत्कृष्ट आशियाई फलंदाज हा किताब मिळाला असेल, त्याला वगळल्याचे दु:ख तर होणारच. पण तो अस्वस्थ झाला नाही. निवडकर्त्यांना उत्तर देण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला. तेव्हा चंदिगडमध्ये जे. पी. अत्रे मेमोरियल कप स्पर्धा सुरू होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजारपेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू संघात परतण्यासाठी ही प्रारंभिक स्तराची स्पर्धा खेळला.
 

2. विश्वास असा की...
कर्णधाराची कौशल्ये शिकवणारे पुस्तक वाचले नाही, व्यावहारिक गोष्टी शिकल्या
गांगुली कर्णधार झाला तेव्हा त्याला माइक ब्रियरलीचे ‘द आर्ट ऑफ कॅप्टन्सी’ हे पुस्तक मिळाले. पण गांगुलीने ते वाचले नाही. तो म्हणाला की, मी बैठक आणि पुस्तकाच्या भरवशावर कर्णधारपद भूषवू शकत नाही. त्याने म्हटले की, ड्रॉ खेळण्याची सवय संघाने सोडावी, असे मला वाटत होते.’ गांगुलीने संघाला स्पष्ट संदेश दिला होता की-जर तुम्ही यशस्वी झाला नाही तरीही मी उभा आहे. सेहवागकडून जेव्हा कसोटीत ओपनिंग करवून घेतली तेव्हाही असेच म्हटले की, घाबरू नको, फेल झालास तरीही संघात राहशील.
 

3. निष्ठा अशी की...
अचानक ओपनिंग करायला सांगितले, तोच यशाचा टर्निंग पाॅइंट ठरला
गोष्ट १९९६ ची आहे. संघ जयपूरमध्ये होता. कर्णधार सचिनने कक्षात बोलावले. तुला सलामीला जायचे आहे असे सचिनने गांगुलीला सांगितले. गांगुली चिंतेत पडला कारण तो कधीही सलामीला गेला नव्हता आणि मालिकेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाचे संघ होते. गांगुलीने स्वत:ला समजावले की, जीवनात जी चांगली गोष्ट होईल ती अचानकच होईल. नंतर गांगुलीने म्हटले की, ‘जर माझा फलंदाजीचा क्रम वर करण्यात आला नसता तर मी जसा खेळाडू होऊ शकलो त्याच्या अर्धाही होऊ शकलो नसतो.
 
 
गांगुलीबाबत जे नेहमी बोलले जाते त्याचे उत्तर
 

>पाणी देण्यास नकार दिला, ड्रिंक्स घेऊन जात नव्हता
प्रशासकीय व्यवस्थापक रणबीरसिंह महेंद्र यांनी गांगुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. तो गर्विष्ठ असल्याचा आरोप झाला. हे चुकीचे आहे. मात्र, एकदा सिडनीत ब्रेकदरम्यान ड्रिंक्स नेण्यात त्याला उशीर झाला, कारण तो टीव्हीवर सामन्याचे समालोचन एेकत होता.

>लाॅर्ड॰सवर शर्ट का काढला 
२००२ मधील या घटनेबद्दल गांगुलीने सांगितले की, ‘ही अँड्र्यू फ्लिंटाॅफला उत्तर देण्याची पद्धत होती. त्याने जेव्हा मुंबईत मालिका जिंकली तेव्हा चिडवण्यासाठी शर्ट काढला होता. तो सांगतो की, शर्ट फिरवताना तू शिव्या देत होतास का, असा प्रश्न लोकांनी मला विचारला. मी सांगितले की, मेरा भारत महान असे मी म्हणत होतो.

>स्टीव्ह वाॅला सात वेळा टाॅससाठी प्रतीक्षा करायला लावली
 गांगुलीने सांगितले, असे तीन वेळा झाले.  स्टीव्ह वाॅ म्हणतो की, गांगुलीने ड्रेसिंग रूममध्ये ब्लेझर विसरल्याचा बहाणा केला. गांगुली म्हणतो की, पहिल्यांदा मी ब्लेझर विसरलो होतो, पण स्टीव्ह चिडत आहे हे पाहिल्यावर मी त्याला मुद्दाम  चिडवण्याचा निर्णय घेतला.