आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींमुळे तुटली होती सलीम-जावेद यांची जोडी, सुपरस्टार बनल्यानांतर बिग बींनी जो अपमान केला, तो सहन करू शकले नव्हते जावेद अख्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वेटरन रायटर आणि शायर जावेद अख्तर नुकतेच 74 वर्षांचे झाले आहेत, 17 जानेवारी 1945 ला ग्वालियर, मध्य प्रदेशमध्ये जन्मलेले जावेद अख्तर कधी सलमान खानचे वडील सलीम खान यांचे जोड़ीदार होते. दोघांच्या जोडीने रायटर म्हणून सिनेसृष्टीला सुमारे 22 चित्रपट दिले. यातील अर्ध्यापेक्षा जास्त  अमिताभ बच्चन यांच्यासोबतच होते. दुसऱ्या शबदात सांगायचे झाले तर अमिताभ यांचे करियर बनवण्यामगे या जोडीचा खूप मोठा हात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, ही जोडी तुटण्यामागचे कारण अमिताभ बच्चन हेच होते. 

 

जेव्हा जावेद अख्तर सहन करू शकले नाही आपला अपमान...
- जर्नलिस्ट अनिता पाध्येने आपल्या मराठी बुक 'यही रंग यही रूप' मध्ये सलीम-जावेद यांच्या ब्रेकअपची कहाणी लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, रायटर जोड़ीने अमिताभ बच्चन यांना एका फिल्मच्या स्क्रिप्टसोबत अप्रोच केले, जी नंतर 'मि. इंडिया' नावाने बनली. अमिताभ यांना अदृश्य माणसाची ही कॉन्सेप्ट आवडली नाही आणि त्यांनी हे सांगून ही फिल्म रिजेक्ट केली की, लोक त्यांना पडद्यावर पाहायला येतात, फक्त आवाज कोण ऐकणार. सलीम-जावेद अमिताभ बच्चन यांच्याकडे यामुळे गेले होते कारण त्यांना वाटले अमिताभ यांच्या आवाज या चित्रपटासाठी सूट करेल. पण अमिताभ यांनी त्यांच्या अपेक्षा मोडल्या.  

 

- बुकनुसार, "जावेद अख्तर यांना वाटले की, या अपमानानंतर त्यांनी आणि सलीम खान यांनी बिग बींसोबत काम केले नाही पाहिजे. पण सलीम खान त्यांच्या निर्णयही सहमत नव्हते. काही दिवसांनी जावेद अख्तर हे अमिताभ यांच्या होळी पार्टीत पोहोचले आणि त्यांना म्हणाले की, सलीम खान त्यांच्यासोबत कधीच काम करू इच्छित नाहीत. या गैरसमजामुळे या जोडीचे व्यावहारिक संबंध बिघडले आणि त्यानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केले नाही" जेव्हा अमिताभ बच्चन यांनी ही ऑफर नाकारली तेव्हा ही फिल्म अनिल कपूर यांना मिळाली. 'मिस्टर इंडिया' 1987 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. 

 

सलीम-जावेद यांनी हे चित्रपट बिग बींसाठी लिहिले... 
- अमिताभ बच्चन 1973 हे ज्या चित्रपटामुळे एका रात्रीत सुपरस्टार बनले आणि अँग्री यंगमॅन या नावाने नवी ओळख मिळवली, तो चित्रपट म्हणजे 'जंजीर'.  हा चित्रपटही सलीम-जावेद यांनीच लिहिला होता. हेदेखील म्हणले जाते की, सलीम-जावेद यांच्या शिफारसीनंतरच प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना या फिल्मसाठी कास्ट केले होते. 'जंजीर' व्यतिरिक्त अमिताभ यांचे 'मजबूर' (1974), 'दीवार' (1975), 'शोले' (1975), 'ईमान धरम' (1977). 'त्रिशूल' (1978), 'डॉन' (1978), 'काला पत्थर' (1979), 'दोस्ताना' (1980), 'शान' (1980) आणि 'शक्ति' (1982) हे चित्रपटही सलीम-जावेद यांच्याच जोडीने लिहिले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...