आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइव्ह शोमध्ये आयुष्याचा प्रवास उलगडत होत्या प्रसिध्द लेखिका, बसल्या-बसल्या झाले निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/नवी दिल्ली: प्रसिध्द लेखिता रीता जतिंदर यांचे दूरदर्शनच्या एका लाइव्ह शो दरम्यान निधन झाले. लाइव्ह शोमध्ये त्या आपल्या आयुष्याच्या प्रवासाविषयी बोलत होत्या. याच दरम्यान त्यांची शुध्द हरपली. जतिंदर यांना काय झाले हे थोडावेळी शोच्या अँकरला कळाले नाही. यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मीडिया रिपोर्टनुसार जतिंदर यांना हार्ट अटॅक आला होता. 

 

शो दरम्यान काय झाले?
सोमवारी सकाळी दूरदर्शनच्या 'काश्मिर चॅनल'वर रीता जतिंदर यांची मुलाखत घेतली जात होती. त्याच दरम्यान ही घटना घडली. प्रसिध्द कलाकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या रीता जतिंदर जम्मूमध्ये राहत होत्या. त्या 'गुड मॉर्निंग कश्मीर'शोच्या अतिथी होत्या. एक लेखक म्हणून त्यांचा प्रवास त्या सांगत होत्या. याच वेळी त्यांचा आवाज अचानक थांबला आणि त्या खुर्चीवरच पडल्या, त्यांचा श्वास वाढला आणि शोचे अँकर हैराण झाले. त्यांना तात्काळ एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतू तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

 

धक्क्यात आहेत चाहते, राजपालांनी व्यक्त केला शोक 
रीता जतिंदर कमी वयातच पाकिस्तानच्या लोहौरमधून जम्मू काश्मीरमध्ये आल्या होत्या. जम्मू काश्मिरमध्ये त्यांनी खुप नाव कमावले. राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी रीता जतिंदर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. तर जतिंदर यांच्या निधानाने त्यांचे मित्र आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...