आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवाद पोटाची भूक भागवत नाही...तरुणाईला मंदिर-मशीद नव्हे, सर्वात आधी नोकऱ्या हव्यात - शोभा डे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - या  निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारी राहील, असे मत प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादाचा मुद्दा उपाशी पोटासाठी परिणामकारक ठरत नाही. बेरोजगारीच्या रांगेत उभ्या युवांना आधी नोकऱ्या हव्यात, मंदिरात कोण प्रवेश करेल, कोण नाही... या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम अाहेत.  शोभा डे यांनी प्रियंका फॅक्टरपासून पुलवामाच्या परिणामापर्यंत विविध मुद्यांवर अापले मतप्रदर्शन केले.  

भाजप सबरीमाला, ट्रिपल तलाक, नराधमांना मृत्युदंड यासारख्या निर्णयातून महिलांना आकर्षित करू शकेल?  
हे एक त्रांगडे आहे. देशातील आर्थिक स्थैर्य सर्वात जास्त परिणाम करते. बेरोजगारांच्या रांगेत उभ्या युवांसाठी मंदिरात कोण प्रवेश करेल व कोण नाही... या बाबी दुय्यम आहेत.  


- पुलवामानंतर राष्ट्रवादाचा मुद्दा झाला का? 
हे पाहा... राष्ट्रवादाचा उपाशी पोटावर परिणाम होत नाही. आमच्या युवांसाठी संधी निर्माण करा. युवा वर्ग नाराज आहे.


- प्रियंकाच्या येण्याने काय परिणाम होईल?  
प्रियंकांना सक्रिय करण्यात काँग्रेसला उशीर झाला आहे. त्यांनी राहुलसाठी याआधीही प्रचार केलेला आहे. त्यांच्या राजकारण प्रवेशाने मोठा फरक पडेल, असे मला वाटत नाही.  


- महिलांची “मन की बात’ काय आहे?  
सर्वात आधी सुरक्षित वातावरण. महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण हवे. एक चांगले आयुष्य असावे. कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवे, यासोबत रस्त्यावर चालताना त्यांच्या मनात नेहमी सुरक्षेची भावना असायला हवी.  


- राममंदिर व पुलवामासारखे हल्ले... महिलांवर छाप पाडतील का?  
राममंदिर महिला-पुरुषांसाठी कोणताही मुद्दा नाही. आवश्यक मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी फोडाफोडीची ही रणनीती आहे. युवा भारत जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी उतरू इच्छित आहे. त्याला एक चांगली जीवनशैली हवी आहे. चांगले रस्ते, शाळा-कॉलेज- रुग्णालय. व्यक्तीच्या जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान निश्चित आहे. मात्र, राजकारणात त्याला कोणतेही स्थान नाही. धर्माच्या आडून लढलेल्या निवडणुकांचा मतदारांवर प्रभाव नसतो.  


- नवमतदारासांठी सर्वात परिणामकारक मुद्दा कोणता असेल?  
युवा स्वार्थी असतात. त्यांना भाषण व ज्ञान नको. त्यांना वेगाने वाढणारी आर्थिक प्रगती हवी. आर्थिक सुधारणा हवी आहे. नोकऱ्यांची संधी हवी आहे. मंदिर-मशीद नको आहे. 


- गेल्या २२ वर्षांत महिला अारक्षण विधेयक मंजूर झाले नाही. केवळ ७% महिला खासदार आहेत. तुम्ही याकडे कसे पाहता?  
पुरुष महिलांच्या महत्त्वाकांक्षांना भितात. महिलांनी आपल्या हक्कासाठी अधिक ताकदीने लढले पाहिजे.  


काँग्रेस २७%, भाजप ४६%  
तीन निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांना तिकीट देण्यात काँग्रेस पुढे आहे. मात्र, जिंकण्यात भाजप पुढे आहे. काँग्रेसच्या सुमारे २७% महिला जिंकू शकल्या. भाजपच्या बाबतीत हा दर ४६% राहिला.


मतदानातही महिला पुढे  
महिला मतदान करण्यात मागे नाहीत. २०१४ महिला मतदारांच्या दृष्टीने ऐतिहासिक होते. कारण, ६६.४% महिलांनी मतदान केले होते. 

बातम्या आणखी आहेत...