आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Written In The Desert Of Biaban Near The International Border In Rajasthan, The Story Of The Country's Energy Sector Change ..

वाळवंटात सापडले तेल... तळपते ऊन-वेगवान वारेही राेखले, सीमेवर लिहिली जातेय नव्या आयुष्याची कहाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे दुबई नव्हे, बाडमेर ... - Divya Marathi
हे दुबई नव्हे, बाडमेर ...
  • राजस्थानात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बियाबानच्या वाळवंटात लिहिली जातेय देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील बदलाची कथा..
  • सौर-पवनऊर्जा व तेलाच्या खाणीमुळे शहर उजळले.. गावेही प्रकाशमान

डी.डी. वैष्णव राजस्थानात आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या भागाची ओळख कायम नादुरुस्त रस्ते व मागास भाग अशी करून देण्यात येते, परंतु गेल्या १५ दिवसांपासून हे चित्र बदलते आहे. बाडमेरमध्ये जमिनीखाली तेल सापडले. येथूनच प्रगतीचा मार्ग सुरू झाला. वेगाने वाहणारे वारे  आणि भाजून काढणारे ऊन या विषम हवामानातही लोकांनी स्वत:च्या प्रगतीचा मार्ग शोधला. आता हा संपूर्ण परिसर पवन ऊर्जेचे केंद्र ठरला आहे. येथे तेल व अक्षय ऊर्जेशी संबंधित उद्योगामुळे रोजगार व समृद्धी तर आलीच शिवाय लोकांचे विचारही बदलले आहेत. आता खेड्यापाड्यांपर्यंत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सीमेलगतच्या गावातील लोक बीएसएफच्या मदतीने सौर ऊर्जेचा वापर करत आहेत. लोकांचे जीवनमान उंचावले आहे. यामुळे येथील लोकांत समाधानाचे वातावरण दिसून येते.   

हे दुबई नव्हे, बाडमेर ...


२००४ मध्ये प्रथमच तेलाचा साठा सापडल्यानंतर बाडमेरचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली. आता बाडमेरमध्ये दररोज २.७५ लाख बॅरल तेलाचे उत्पादन होते आहे. देशातील स्थानिक उत्पादनाच्या २५% आहे. केयर्न ऑइल अँड गॅसने २०२५ पर्यंत संपूर्ण देशातंर्गत उत्पादनाच्या ५०% तेलसाठा काढण्याची तयारी केली आहे. केयर्नचे एकूण १५०० कर्मचारी मंगला आॅइल फील्डमध्ये कार्यरत आहेत. ही संख्या ३० टक्क्यांनी वाढवणार आहेत. सौरऊर्जा उत्पादनात नंबर वन


देशात सौरऊर्जा उत्पादनात राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. देशात ५ हजार मेगावॅटपेक्षा जास्त सौरऊर्जेचे उत्पादन होते. यापैकी राजस्थानात १० ते १२% उत्पादन होते. राजस्थानात दररोज २४०० ते २५०० लाख युनिट वीज वापरली जाते. यात १५० लाख युनिट सौर व ३५० लाख युनिट पवनऊर्जेचा समावेश आहे. 


> 4811 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, २५ हजार मेगावॅटचे उद्दिष्ट
> 4310 मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प, ८ हजार मेगावॅटचे उद्दिष्ट
भडला सोलार पार्कसारख्या मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाची सर्वांना माहिती आहे. परंतु सौरऊर्जेमुळे सीमेवरील भागात प्रत्येक स्तरावर बदल झालेले दिसून येतात. हे चित्र अमीर वस्तीचे आहे. अशा वस्त्यांत सौर पॅनल आता सगळीकडे दिसून येतात. याच्या मदतीने झोपड्यात पंखे चालतातबातम्या आणखी आहेत...