आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एजबेस्टन - क्रिकेटचा खेळ जितका खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहे, तितकाच पंचांसाठीही आहे. खासकरून मैदानावरच्या पंचांना डाेळ्यात तेल घालून सामन्यातील प्रत्येक हालचाली टिपाव्या लागतात. त्यामुळे क्षणाक्षणाला हाेणाऱ्या काही घटनांदरम्यान पंच पारदर्शकपणे निर्णय देतात, तर काही वेळा त्यांना चुकीच्या निर्णयाने टीकेलाही सामाेरे जावे लागते. याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या अॅशेस कसाेटी मालिकेदरम्यान आला. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीच्या कसाेटी सामन्यात विंडीजचे पंच विल्सन यांनी विक्रमी आठ वेळा चुकीच्या पद्धतीने निर्णय दिले. याच चुकीच्या निर्णयावर एका नाराज युजरने आपला संताप व्यक्त केला. त्याने विल्सनच्या विकीपीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. त्याने यादरम्यान त्या पेजवर जाऊन प्राेफाइलमध्ये “मी आंधळा पंच आहे’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळे आता विंडीजचे हे पंच विल्सन चांगलेच वादात सापडले आहेत. मायकेल वाॅननेही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विल्सनची १०२ सामने व २ वर्ल्डकपमध्ये पंचगिरी
विंडीजच्या ५२ वर्षीय विल्सनने १४ कसाेटी, ६३ वनडे आणि २६ टी-२० सामन्यात पंचगिरी केली आहे. याशिवाय २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकादरम्यानही पंचाची भूमिका बजावली आहे. जुलै २०१९मध्ये त्यांना दिग्गज पंच इयान गाेउल्ड निवृत्त झाल्यानंतर आयसीसीच्या पंच एलिट पॅनल्समध्ये सहभागी करण्यात आले हाेते. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यादरम्यान यजमान इंग्लंडच्या जेसन राॅयने याच पंचांना धडक दिली हाेती.
रुटला शेवटच्या दिवशी दाेन वेळा बाद दिले, दाेन्ही वेळा नाॅट आऊट स्पष्ट
विल्सन यांची सुमार पंचगिरी ही सलामीच्या कसाेटीच्या पाचव्या दिवशी अधिकच वादग्रस्त आणि चर्चेत आली. त्यांनी इंग्लंडचा कर्णधार ज्याे रुटला पायचीत असल्याचा निर्णय दिला हाेता. मात्र, रुटने लगेच रिव्ह्यू घेतला. यादरम्यान ताे नाबाद असल्याचे दिसून आले. त्यानंतर पुन्हा एकदा पंच विल्सन यांनी रुटच्या बाबतीत चुकीचा निर्णय दिला. त्यांनी १७ व्या षटकात सिडलच्या चेंडूवर रुट पायचीतचा निर्णय दिला. मात्र, रिव्ह्यूमध्ये हे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.
पााँटिंग म्हणाला, नियमाविरुद्ध अपील
क्रिकेटच्या सामन्यात न्यूट्रल पंच ठेवण्याचा नियम आहे. दाेन संघ मैदानावर सामना खेळत आहेत, तेव्हा सामन्यासाठीचा पंच हा त्रयस्थ देशाचा असावा. यातूनच निर्णय पद्धतीमध्ये पारदर्शकता निर्माण हाेते. यामुळे आयसीसीने पॅनलमध्ये विल्सनची नियुक्ती केली .
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.