आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनसाेबत बॉलिवूड डान्स करताना दिसली डब्ल्यूडब्ल्यूई स्टार शार्लेट, व्हिडिओ झाला व्हायरल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता वरुण धवनला चित्रपटाराेबरच डब्ल्यूडब्ल्यूईचीदेखील चांगली आवड आहे. हॉलिवूड सुपरस्टार्स आणि द रॉक यांची नक्कल करून त्याने हे बऱ्याच वेळा सिद्ध केले आहे. नुकतीच त्यांनी मुंबईत डब्ल्यूडब्ल्यूई महिला चॅम्पियन शार्लोट फ्लेअरची भेट घेतली. या भेटीत वरुणने तिला बॉलिवूड डान्स शिकवला. या दोघांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये वरुण तिला बॉलिवूड डान्स शिकवत आहे. फ्लेअरने व्हिडीओसाेबत ट्वीट केले आहे, तिने लिहिले, 'साल्सा डान्स नव्हे पण मी बॉलिवूडमधील काही डान्स मूव्हज नक्कीच शिकत आहे. मला बॉलिवूडसाठी तयार केल्याबद्दल वरुण धवनचे आभार.' वरुणनेही ट्वीटला प्रत्युत्तर देत म्हटले, 'त्यांना भेटून खूप आनंद झाला.'