Home | International | Other Country | WWE wrestler Dean Ambrose decide to retire from WWE

WWE स्टार बनण्यापूर्वी अंमली पदार्थ आणि रिंगमध्ये विकायचा पॉपकॉर्न!

दिव्य मराठी | Update - Apr 13, 2019, 11:30 AM IST

वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटमधून (डब्ल्यूडब्ल्यूई) निवृत्तीची घोषणा केली...

 • WWE wrestler Dean Ambrose decide to retire from WWE

  डीन अॅम्ब्रोज, व्यावसायिक मुष्टियोद्धा

  जन्म- ७ डिसेंबर १९८५ (सिनसिनाटी, यूएसए)
  शिक्षण- स्कूल ड्रॉपआउट पत्नी- रेनी यंग (डब्ल्यूडब्ल्यूई समालोचक)
  शरीराचे मोजमाप - उंची ६ फूट ४ इंच, वजन - १०२ किलो
  चर्चेत का- वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटमधून (डब्ल्यूडब्ल्यूई) निवृत्तीची घोषणा केली...

  डीन अॅम्ब्रोज (जोनाथन डेव्हीड गुड) सिनसिनाटीच्या ज्या परिसरात राहायचे तेथे, अंमली पदार्थांचा व्यवसाय खुलेआम चालायचा. वडील पोलिस. आईही कामाच्या निमित्ताने घराबाहेरच असायची. अशावेळी डीन घरी एकटा पडायचा. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या संपर्कात ओढला गेला. त्यात अंमली पदार्थ विक्रीचाही समावेश होता. रिकाम्या वेळेत मुष्टीयुद्धाची कॅसेट भाड्याने आणून तो डब्ल्यूसीडब्ल्यू आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ लढतीचे व्हिडिओ पाहायचा. व्हिडिओ पाहत-पाहतच डीनने ठरवले की मुष्टियोद्धाच बनायचे.


  १६ वर्षीय डीनला एका मुष्टियुद्धाच्या प्रशिक्षण शिबिराबद्दल माहिती मिळाली. मुष्टियोद्धा लेस थॅचरने ‘हार्टलँड रेसलिंग असोसिएशन’ हे शिबिर आयोजित करणार होते. डीन याने लेस यांना पत्र लिहिले. आपल्या निवडीची विनंती केली. मात्र वय कमी असल्याचे सांगून लेस यांनी मनाई केली. त्याला आपले शिक्षण पूर्ण करायचे होते. सोबतच वेट ट्रेनिंग पूर्ण करायची होती. मात्र डीनला हे मान्य नव्हते. अशात डीनने एका दुसऱ्या प्रशिक्षण शिबिरात वय लपवून प्रवेश घेतला. मात्र लवकरच त्याचे खरे वय कळले. शिबिरातून काढण्यात आले. डीन पुन्हा हार्डलँड रेसलिंग असोसिएशनमध्ये आला. मुष्टियुद्धाप्रती असलेले आपले प्रेम, तळमळ सांगितली. शेवटी असोसिएशनने डीनला प्रवेश दिला. मात्र येथे त्याचे काम खुर्च्या एकत्र करणे व पॉपकॉर्न विकणे एवढेच होते. डीनने एक वर्ष रिंगची साफसफाई केली. लांबूनच मुष्टियुद्धाचे डावपेच शिकले.

  डीनने २००४ मध्ये मुष्टियुद्धात प्रवेश केला. डब्ल्यूडब्ल्यूईत सर्व्हाइव्हर सिरीजद्वारे २००५ मध्ये डेब्यू केला. डीनजवळ हेवीवेट, युनायटेड स्टेट, इंटरकॉन्टिनेंटल चॅपियनशिपचे विजेतेपद आहे.

Trending