आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या कबरीत सांगाड्याचे धड गायब असेल तेथेच ३६० वर्षांपासून दफन आहेत दारा शिकोह; एक्स-रे इमेज तंत्रज्ञानाने घेणार शोध

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

के.के. मोहंमद, माजी विभागीय संचालक, एएसआय केंद्राला समोर आणायचा आहे दारांचा वारसा, मात्र सर्वात मोठा सवाल ... ती कबर कशी शोधायची? गीता आणि ५२ उपनिषदांचा प्रथमच संस्कृतमधून फारसीत अनुवाद करून अवघ्या जगाला भारतीय सनातन संस्कृतीचा परिचय करून देणारे दारा शिकोह यांची कबर कुठे आहे, हे रहस्य त्यांच्या मृत्यूच्या ३६० वर्षांनंतरही कायम आहे. त्याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापण्यात आली आहे.  दारा शिकोह यांचा देह कुठे दफन आहे, हा सवाल त्यांच्या मृत्यूच्या ३६० वर्षांनंतरही कायम आहे. आता या मध्ययुगीन विद्वान राज्यकर्त्यास त्याचा सन्मान मिळवून देण्यासाठीचे केंद्र सरकारचे प्रयत्न चर्चेत आले आहेत. निश्चितच भारतात दारा शिकोह यांचे भव्य स्मारक व्हायला हवे. ते कुठे आणि कसे असावे, हे सरकार ठरवणार आहे. त्यांची कबर शोधण्यासाठी सरकार आणि एएसआय (भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण) हातात मावण्याजोग्या एक्स रे उपकरणाच्या मदतीने दिल्लीत हुमायूनच्या मकबऱ्यामागील कबरींचे एक्स रे काढले जाऊ शकतात. तसेच ग्राउंड पेनिट्रेशन रडार सर्व्हेही केला जाऊ शकतो. यामुळे येथे दफन मृतदेहांच्या सांगड्यांच्या इमेजेसही समोर येतील.  ऐतिहासिक प्रमाणांनुसार, मोगल काळात दारा शिकोह वगळता कोणत्याही मोगल शहजाद्याचे शीर कलम करून फक्त धडच दफन केले गेल्याचे दुसरे उदाहरण नाही. एक्स रे इमेजमध्ये ज्या कबरीत धड नसलेला सांगाडा आढळेल, तीच कबर दारा शिकोहची मानावी. दारानेच पहिल्यांदा भगवद्गीतेसह ५२ उपनिषदांचा संस्कृतमधून फारसीत सिर्रे-अकबर (महान रहस्य) नावाने अनुवाद केला होता. १८०१-०२ मध्ये फ्रेंच तत्ववेत्ता अँक्वेटिल डुपरॉनने सिर्रे-अकबरचा लॅटिन भाषेत अनुवाद केल्यानंतर जगाला भारतीय संस्कृतीबाबत सविस्तर माहिती मिळाली. 

भाऊ औरंगजेबाने दाराचे शिर कलम करून आग्ऱ्याच्या किल्ल्यात लटकवले होते 


बादशहा शहाजहाननंतर दारा शिकोह दिल्लीच्या गादीचा वारसदार होता. दारावर कट्टरपंथीयांनी बुतपरस्त (मूर्तिपूजक)  असल्याचा आरोप केला होता. त्याचा फायदा उचलून औरंगजेबाने बंड केले आणि स्वत:ला बादशहा घोषित केले. ३० ऑगस्ट १६५९ ला दिल्लीत दारा शिकोहला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. दाराचे शिर कलम करून आग्ऱ्याला नेले, धड दिल्लीत हुमायूनच्या मकबऱ्याजवळ दफन करण्यात आले. 
 

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने स्थापली समिती 

सांस्कृतिक मंत्रालयाने दाराची कबर शोधण्यासाठी टी.जे. अलोन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची ७ सदस्यीय समिती स्थापली आहे. त्यात के.के. मोहंमद यांच्यासह एएसआयचे माजी महासंचालक आर.एस. बिष्ट, बी.आर. मणी, के.एन. दीक्षित, बी.एम. पांडेय, अश्विनी अग्रवाल, सय्यद जमाल हसन यांचा समावेश आहे.कबरीचा शोध घेऊन संरक्षण करणार

दारा शिकोहच्या कबरीबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. त्याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापण्यात आली आहे. कोणत्या पद्धतीने दाराची कबर शोधून तिचे संरक्षण केले जाऊ शकते का हे तीच समिती सांगेल.  - टी.जे. अलोन, 
संचालक (स्मारक) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण