आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Xiaomi Company Offers Discounts On Many Products, Including Smartphones, Power Banks And Headphones

श्याओमी कंपनी स्मार्टफोन, पावर बँक, आणि हेडफोनसह अनेक प्रॉडक्ट्सवर देत आहे डिस्काउंट; सुरुवाती किंमत फक्त 99 रुपये

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - चीनी कंपनी श्याओमीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर व्हॅलेंटाइन डे  सेल सुरू केला आहे. कंपनीने या सेलला मी व्हॅलेंटाइन स्टोर नाव दिले आहे. विशेष बाब म्हणजे येथे फक्त 99 रुपयांपासून गिफ्टच्या वस्तून खरेदी करू शकता. कंपनीने येते सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स जसे की, पावरबँक, स्मार्टफोन, इअरफोन, हेडफोन, डाटा केबल, चार्जर, सनग्लासेस, टी-शर्ट, बॅग इत्यादी विक्री करत आहेत. हा सेल कधीपर्यंत सुरू राहिल याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले नाही. 

99 रुपयांत फोन ग्रिप आणि स्टँड


एमआयच्या या स्टोअरवर फ्लिक्स फोन ग्रिप हे सर्वात स्वस्त प्रॉडक्ट आहे. याची किंमत फक्त 99 रुपये आहे. परंतु लाल रंगाव्यतिरिक्त काळा किंवा निळ्या रंगाचे ग्रिपसाठी 149 रुपये खर्च करावे लागतील. या ग्रिपला फोनच्या बॅक साइडला फिक्स केले जाते. यामध्ये एक फिंगर होल्हर देण्यात आले आहे. तुमचा फोन हातून खाली पडण्यापासून ते मदत करते.  1299 रुपयांत ब्लूटूथ इअरफोन


कंपनी 1299 रुपयांत ब्लूटूथ इअरफोनची विक्री करत आहे. याला IPX4 रेटिंग देण्यात आली आहे. हे ब्लूटूथ डायनामिक बास आणि ब्लूटूथ 4.1 कनेक्टिव्हिटी सोबत येते. कंपनीचे म्हणणे आहे की, सिंगल चार्जवर 9 तासांचा बॅकअप देते. ब्लॅक आणि व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये खरीदे करता येते. 

2499 रुपयांत स्पोर्ट्स शू


तुम्ही जर कोणाला स्पोर्ट्स शू गिफ्ट करू इच्छित असाल तर श्याओमीचा मेन्स स्पोर्ट्स शू एक पर्याय ठरू शकतो. हा शू 2499 उपलब्ध आहे. ब्लॅक, ब्लू आणि ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. तर हे शू 6 साइज UK6 ते UK11 पर्यंत उपलब्ध आहेत. 

एमआय फिटनेस बँड


जर तुम्हाला एमचा फिटनेस बँड गिफ्ट करायचा असेल तर तुम्हाला तीन मॉडेलचे पर्याय मिळतील.यामध्ये एमआय बँड 3 (किंमत 1599 रुपये), एमआय स्मार्ट बँड 3i (किंमत 1299 रुपये) आणि एमआय बँड 3 (किंमत 2299 रुपये) आहे. बँड 4 हे कंपनीने लेटेस्ट बँड आहे.