शाओमीचे तीन टीव्ही / शाओमीचे तीन टीव्ही 2 हजार रूपयांनी स्वस्त, जीएसटी दर 28% वरून 18% झाल्यानंतर कंपनीने घेतला निर्णय

दिव्य मराठी वेब टीम

Jan 03,2019 12:03:00 AM IST


गॅजेट डेस्क : चीनी कंपनी शाओमीने नवे वर्ष सुरू होताच आपल्या दोन टीव्हीच्या किमती 2 हजार रूपयांनी स्वस्त केल्या आहेत. कंपनीने किंमत कमी केलेल्या टीव्हींमध्ये एमआय स्मार्ट टीव्ही 4A (32 इंच), एमआय एलईडी टीव्ही 4C प्रो (32 इंच) आणि एमआय एलईडी टीव्ही 4A प्रो (49 इंच) यांचा समावेश आहे. श्याओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे टीव्हींची किंमत कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आता इतक्या मध्ये खरेदी करा हे टीव्ही

शाओमीच्या मते, एमआय एलईडी टीव्ही 4A (32 इंच) ची किंमत दीड हजार रुपयांनी कमी होऊन 12,499 रुपये झाली आहे. तर एमआय एलईडी टीव्ही 4C प्रो (32 इंच)ची किमतीत 2 हजार रूपयांनी घट होऊन 13,999 रूपयांनी मिळणार आहे. एमआय एलईडी टीव्ही 4A प्रो (49 इंच)या टीव्हीची किंमत फक्त 1 हजार रूपयांनी कमी करण्यात आली आहे. सध्या या टीव्हीची किंमत 30,999 रूपये झाली आहे. या सर्व टीव्हींची खरेदी करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट mi.com वर भेट देऊ शकतात.

22 डिसेंबर रोजी कमी केले होते जीएसटी दर, 1 जानेवारीपासून करण्यात आले लागू

22 डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत सामान्य नागरिकांच्या वापरातील 17 वस्तू आणि सेवांवरील जीएसटी दर 28% टक्क्यांवरून 18% केला होता. या नवीन दरांना 1 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहे. यामुळे 32 इंचपर्यंतचे टीव्ही, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डर सहित अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहेत सुरुवातीला 28% प्रकारात 226 वस्तू आणि सेवांचा समावेश होता. पण आता त्यावरील दर कमी केल्याने 18% प्रकारात 517 वस्तू आणि सेवांचा समावेश झाला आहे.

X
COMMENT