• Home
  • Business
  • Xiaomi Founder Lei Jun to Donates His Bonus Shares of USD 1billion to Charity

जगातील टॉप स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या श्याओमी मोबाईलचे फाउंडर बोनसमध्ये मिळालेले 6631 कोटींचे शेअर करणार दान


ले जुन यांना 2018 मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल मिळाले आहे बोनस
 

दिव्य मराठी

Apr 12,2019 06:20:00 PM IST

बीजिंग- जगातील टॉपच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या श्याओमीचे फाउंडर आणि सीईओ ले जुन यांना 96.1 कोटी डॉलरच्या (6,631 कोटी रूपये ) व्हॅल्यूचे 63.66 कोटी शेअर बोनसमध्ये मिळाले आहेत. कंपनीमध्ये जुन यांनी दिलेल्या योगदानमुळे त्यांना हे बोनस दिले आहे. जुन हे सर्व शेअर दान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने बुधवारी रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये ही माहीती दिली. कंपनीकडून हे दान कोणाला दिले जाणार आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. चीनमध्ये मागील वर्षी स्मार्टफोनच्या विक्रीत घट झाल्यामुळे श्याओमीच्या शेअरची किंमत कमी झाली होती. श्याओमीला सॅमसंग, अॅपल, हुवावे, ओप्पो आणि व्ही.वो. या स्मार्टफोनसोबत स्पर्धा करावी लागत आहे. 10 वर्षांपासून स्मार्टफोन मार्केटमध्ये असलेल्या श्याओमी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी जुलै महिन्यात हॉन्गकॉन्गच्या शेअर बाजारामध्ये लिस्ट झाले होते.


श्याओमीचे शेअर कोसळुन सुध्दा जुन यांचे सध्याचे नेटवर्थ 11 अब्ज डॉलर आहे. ब्लमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार जगातील 500 अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा 126 वा क्रमांक आहे. रिसर्च फर्म आयडीसीनुसार 2018 मध्ये श्याओमी जगातील चौथी मोठी स्मार्टफोन कंपनी म्हणून नावारूपाला आली होती. मागील वर्षी कंपनीची हँडसेट डिलीव्हरी ग्रोथ 32.2 टक्के होती.

X