आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क- चीनी कंपनी श्याओमीने भारतीय बाजारात नवीन Mi बँड लॉन्च करण्याची तयारी केली आहे. रिपोर्ट्सनुसार नवीन बँड मोठी स्क्रीन आणि निअर फील्ड कम्युनिकेशन (NFC)सारख्या फीचर्ससोबत येईल. तर, याची किंमतही समोर आली आहे.
मोठी स्क्रीन आणि इतर फीचर्स
लीक स्पेसिफिकेशननुसार Mi बँड 5 मध्ये 1.2-इंच डिस्प्ले स्क्रीन मिळेल. यात ग्लोबल सपोर्ट करणारा नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) फीचरदेखील मिळेल. पण, गे फीचर कंपनीने Mi बँड 3 आणि Mi बँड 4 मध्येही दिला आहे. या नवीन बँडची किंमत 179 युआन (भारतीय 1800 रुपये) असू शकते. यावर्षी चूनपर्यंत हा नवीन बँड भारतीय बाजारात लॉन्च होईल.
Mi बँडचे स्पेसिफिकेशन
श्याओमीच्या बँडमध्ये कलर डिस्प्लेसोबतच 2.5D टेम्पर्ड ग्लास दिला आहे. जो 5 लेवल ब्राइटनेससोबत येतो. यात हेल्थ आणि फिटनेसशी निगडीत फीचर्स जसे ट्रेडमिल रनिंग, एक्सरसाइज, आउटडोर रनिंग, साइक्लिंग, वॉकिंग, पूल स्वीमिंगसारखे ट्रँकर दिले आहेत. तसेच यात हार्ड रेट मॉनिटरिंगदेखील असेल. Mi बँड 4 मध्ये 135mAh बॅटरी आहे, जी 20 दिवसांचा बॅटरी बॅकअप देईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.