• Home
  • Business
  • Xiaomi Mi Super Bass Wireless Headphones Launched in India at priced 1799 rupees

Gadget Desk / श्याओमीने लॉन्च केले 1799 रुपये किमतीचे Mi सुपर बेस वायरलेस हेडफोन, 20 तास टिकेल चार्जिंग


कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 शिवाय 3.5 एमएमचे सॉकेटदेखील आहे
 

दिव्य मराठी

Jul 15,2019 06:33:00 PM IST

गॅजेट डेस्क- श्याओमीने आपले नवीन सुपर बेस वायरलेस हेडफोन भारतात लॉन्च केले आहेत. याची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. श्याओमी भारतीय बाजारात आपल्या अफोर्डेबल ऑडियो एक्सेसरीज रेंजला वाढवण्याच्या तयारीत आहे, त्या अंतर्गत कंपनी वायर्ड आणि वायरलेस हेडफोन/ इअरफोन, साउंडबार, वायरलेस स्पीकर्ससारखे प्रोडक्ट बाजारात आणत आहे. एमआयचे हे वायरलेस हेडफोन अॅमेझॉनवर सुरू असलेल्या प्राइम डे सेलमध्ये मिळत आहे. हे ब्लॅक-रेड आणि ब्लॅक-गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत. याला अॅमॅझॉन शिवाय एमआय इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवरुनही खरेदी करता येईल.

आरउंड इअर डिजाइनचे आहेत हेडफोन
श्याओमीचे एमआय सुपर बेस वायरलेस हेडफोनला अराउंड इअर डिझाइन देण्यात आले आहे, ज्यात हेडबँडच्या आत पेडिंगदेखील मिळते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जिंगमध्ये 20 तासांचा बॅकअप या फोनमधून मिळतो, हेडफोनमध्ये 40 एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 ची सुविधा आहे. हेडफोनच्या मदतीने यूझर आपल्या स्मार्टफोनच्या वॉयस असिस्टेंट फीचरचा एक्सेस घेता येईळ.

चार्जिंगसाठी यात बॉटममध्ये मायक्रो-यूएसबी पोर्ट दिला आहे. त्याशिवाय 3.5 एमएम सॉकेटदेखील आहे, ज्याच्या मदतीने बॅटरी संपल्यावर याला वायर कनेक्ट करून वापरले जाउ शकते. याची टक्कर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बोटच्या अफोर्डेबल वायरलेस हेडफोन रॉकर्ज 400 आणि एंट ऑडियो ट्रिबल 900 सोबत आहे, याचे आरउंड इअर डिझाइन याला जास्त कंफर्टेबल बनवतात.


X