Tech News / 108MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन घेऊन येत आहे Xiaomi, सॅमसंगसोबत केला करार

लवकरच 108MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन लाँच करणार श्याओमी

Sep 03,2019 04:07:00 PM IST

गॅजेट डेस्क - जगभरात 48 मेगापिक्स कॅमेऱ्यांचा ट्रेंड सुरू आहे. भारतात तर अगदी 10 हजार रुपयांच्या आत सुद्धा 48 मेगिपिक्सलचे फोन उपलब्ध आहेत. अशात 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याच्या फोनची चर्चा सुरू असताना चिनी स्मार्टफोन कंपनी ग्राहकांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. श्याओमी लवकरच आपला 108 मेगापिक्सलचा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. श्याओमीने या खास स्मार्टफोनसाठी कोरिअन टेक कंपनी सॅमसंगसोबत पार्टनरशिप करार केला आहे.


चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी श्याओमी आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल कॅमेरा असलेला स्मार्टफोन तयार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये 108 मेगापिक्सलचे 4 स्मार्टफोन येऊ शकतात. कंपनीने यासाठी सॅमसंगसोबत पार्टनरशिप केली आहे. अर्थात श्याओमी फोनमध्ये सॅमसंगचा 108 मेगापिक्सल सेन्सर कॅमेरा वापरणार आहे. सॅमसंगचा ISOCELL Bright HMX कॅमेरा सेन्सर सर्वप्रथम Xiaomi ने Mi MIX 4 फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये वापरण्याची तयारी केली आहे.


XDA डेव्हलपर्सचे रिपोर्ट...
XDA डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार, श्याओमीच्या 108 मेगापिक्सल असलेल्या चार नवीन स्मार्टफोनची माहिती MIUI गॅलरी अॅपवर देण्यात आली आहे. MIUI गॅलरी App कडे 108 मेगापिक्सलचे फोटो फुल रेझोल्यूशनमध्ये पाहण्याचे अतिरिक्त सपोर्ट देण्यात आले आहे. सोबतच, स्मार्टफोनचे इतर फीचर सुद्धा जारी करण्यात आले आहेत. अॅपवर हे स्मार्टफोन 'tucana', 'draco', 'umi' आणि 'cmi' या कोडनेमने जारी करण्यात आले आहेत.

X