आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाओमीने लॉन्च केले दोन नवीन स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीनी इलेक्ट्रानिक्स कंपनी Xiaomi ने गुरूवारी दोन नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आणि Mi साउंडबारच्या लॉन्चिंगसोबतच होम ऑडियो कॅटेगरीमध्ये एंट्री मारली. शाओमीच्या टीव्हीमध्ये एक Mi LED TV 4X Pro आहे, जो की साइजमध्ये 55 इंच आहे. या टीव्हीची किंमत 39,999 रूपये आहे, तर दुसरा टीव्ही Mi LED TV 4A आहे, हा टीव्ही 43 इंच आहेत आणि याची किंमत 22,999 रूपये आहे.
 

15 जानेवारीपासून सुरू होईल विक्री
कंपनीकडून सांगण्यात आले की, हे दोन्ही टीव्ही 15 जानेवारी 2019 पासून उपलब्ध होतील. त्याशिवाय Mi साउंडबारची किंमत 4999 असू शकते. या साउंडबारला 4999 रूपयात 16 जानेवारीपासून Mi च्या वेबसाइट आणि Mi होम स्टोरमधून खरेदी केले जाऊ शकते. Mi टीव्हीचे इंडिया हेड ईश्वर नीलकंठ यांनी सांगितले की, मागच्या वर्षी Mi टीव्ही लॉन्च केला होता. त्यावेळस अनेक माइलस्टोन सेट करताना आम्ही भारतचा टॉप टीव्ही ब्रँड बनले आहोत. कंपनीने मागच्या 9 महिन्यात अंदाजे 10 हजार टीव्हीची विक्री केली आहे.
 
 
स्पेसिफिकेशन 
Mi LED TV 4x pro मध्ये 55 इंच 4K UHD डिस्पले. कलर डेप्थसोबतच हा टीव्ही HDR 10 ला सपोर्ट करतो. Mi LED TV 4X pro 43 इंच फुल एचडी डिस्पलेसोबत येतो. यांत 1920/1080 पिक्सल रेज्यूल्यूशन मिळते. दोन्ही टीव्हीमध्ये 20 वॉटचे ऑडियो फीचर आणि ब्लूटूथ रिमोट आहे.

बातम्या आणखी आहेत...