आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ya Devi Sarvabhuteshu Matruroopen Sanstita Namastasai Namastasai, Namastasai Namo Namo:

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता... नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयंतीलाल गढांच्या ‘कहानी’ चित्रपटात विद्या बालनने विद्या बागची नामक पात्र केले, जी आपल्या हरवलेल्या पतीच्या शोधात लंडनहून कोलकात्याला येते. मुळात तिचा उद्देश एका अतिरेक्याला शोधण्याचा असताे, ज्याने रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट घडवला आणि त्यात तिच्या पती मारला गेलेला असताे. तिने गर्भवतीचे वेशांतर केलेले असते. वरिष्ठांचा विरोध सहन करीत एक पोलिस अधिकारी तिची मदत करतो. पती ज्या हॉटेलात राहिला तिथेच ती उतरते. गुप्तहेर अधिकारी असणाऱ्या सासऱ्याची ही सून असते. त्यांच्या योजनेनुसारच त्या अतिरेक्याला शोधण्यासाठी आलेली असते. संपूर्ण घटनाक्रम खूप रहस्यमय असून देवी विसर्जनाच्या दिवशी ती त्या अतिरेक्याला मारते. या मिरवणुकीत ती पारंपरिक लाल साडीचा पोशाख व कुंकवाने सर्वांगाला माखून सहभागी झाली, जिचा शोध पोलिस घेत असतात.  नवाजुद्दीन सिद्दिकीने गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्याची भूमिका वठवली आहे. ते आणि ‘विद्या बागची’ला शोधण्यात अयशस्वी झालेले अधिकारी ती ज्या हॉटेलात उतरली होती तिथे तिच्या बोटांचे ठसे मिळतात का हे पाहण्यासाठी जातात. परंतु ते ठसे पुसले गेलेले असतात. या नावाची स्त्री कोलकात्यात आलीच नसल्याचे त्यांना समजते.  शेवटच्या दृश्यात गर्भवती स्त्रीचे सोंग करता करता मी माझे अपत्य गमावले आहे व हे करताना माझ्या हृदयात गर्भवतीची भावना जागृत झाली, असे विद्या आपल्या सासऱ्याला म्हणते. या हल्ल्यात काही अधिकारीही सामील होते. जसे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात होते. गुरुदत्त यांनी जितके चित्रपट बनवले तितकेच चित्रपट प्रदर्शित न करता सोडून दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात केदार शर्मांनी एक चित्रपट बनवला, ज्यात एक शिल्पकार काल्पनिक चेहऱ्यांच्या मूर्ती बनवत असतो, पण एकदा त्याला अशाच चेहऱ्याशी साम्य असणारी स्त्री भेटते. मानवी मनात काही गोष्टी नाेंदल्या गेलेल्या असतात. टायटॅनिक जहाज बुडण्याच्या १४ वर्षे आधी मार्गन रॉबर्टसन यांनी एक काल्पनिक कादंबरी लिहिली होती. त्यात पंचतारांकित जहाज पाण्यात बुडते असा आशय होता. नदीकाठावर बसलेला मनुष्य पाहतो की, नदीमधून उठलेली लाट पृष्ठभागावर प्रवाहित लाटांमध्ये एकरूप होते आणि तिथे पाण्यावर एक घुमटाकार आकार तयार होतो. कधी कधी तिन्ही काळातील असे आभास सामान्य व्यक्तीही वाचू शकतो, जे निसर्गातील रहस्य आहे. मानवी जीवन हे आकाशात चमकणाऱ्या तारकांपेक्षा अधिक नद्या आणि समुद्रात उठणाऱ्या लाटांप्रमाणे संचालित आहे, म्हणूनच एका सणामध्ये दिव्यांना पाण्यात सोडण्याची प्रथा आहे, ज्याचे चित्रण विधू विनोद चोप्रा यांच्या ‘करीब’ या चित्रपटात दर्शवले आहे. बदलत्या युगात ‘व्हॅलेंटाइन डे’ने सांस्कृतिक अतिक्रमण केले आहे. ‘पोळा’ सणात बैलांना सजवून त्यांच्या शिंगांना रंगवले जाते. या शिंगांवर रात्री चमकणारा फ्लाेराेसेंट रंग लावला तर अपघातांपासून बचाव करता येऊ शकतो, पण सरकारला अपघातातून लोकसंख्या नियंत्रित करावयाची आहे. मृणाल सेनच्या ‘अकालेर साधने’त बंगालमध्ये आलेला दुष्काळ हा मानवाद्वारे निर्माण करण्यात आल्याचे दर्शवण्यात आले आहे. अमर्त्य सेन यांनाही दुष्काळावरील शोधामुळे नोबेल पुरस्कार देण्यात आला. कोलकात्यात नवरात्रोत्सव, तर महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुजरातमध्ये गरबा नृत्य उत्साहाने केले जाते व मुंबईत स्थायिक झालेले गुजराती व परदेशातील गुजरातीही मोठ्या उत्साहाने तो साजरा करतात. मागील वर्षी सलमान खानने गरब्यावर आधारित ‘लव-रात्री’ नामक चित्रपट बनवला होता. बंगालमध्ये या काळात नवी पुस्तके प्रकाशित होतात. कारण या पूजेत पुस्तके खरेदी करणे अनिवार्य असते. यंदाच्या नवरात्रोत्सवात कोलकात्यात सोन्याच्या देवीची मूर्ती बनवण्यात आली, जिची किंमत तीन कोटी रुपये आहे. जयंतीलाल गढांकडे ‘कहानी’सारखी अजून एक पटकथा आहे, पण ते सध्याला अन्य कामात व्यग्र आहेत. 

बातम्या आणखी आहेत...