आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलियुगाच्या शेवटी जागे होणार नंदी, एक-एक इंच वाढत आहे या नंदीची मूर्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्रप्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यातील यागंती उमा महेश्वर मंदिर आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. हे मंदिर अद्भुत असण्यासोबतच विविध रहस्यांनी भरलेले आहे. या मंदिरातील नंदीची मूर्ती चमत्कारिकरीत्या विशालकाय होत चालली आहे. यामुळे हे मंदीर खूप चर्चेत आहे.


खरंच जिवंत होणार नंदी?
या नंदीविषयी अशी मान्यता आहे की, एके दिवशी नंदी महाराज जिवंत होणार आणि हे जिवंत होताच या संसारात प्रलय येणार आणि कलियुगाचा अंत होणार.


20 वर्षात 1 इंच वाढते ही मूर्ती 
या यागंती उमा महेश्वर मंदिरात स्थापित नंदी मूर्तीचा आकार प्रत्येक 20 वर्षांनी जवळपास एक इंच वाढतो. हे रहस्य शोधून काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी शोधही घेतला. या शोधानुसार ही मूर्ती बनवण्यासाठी ज्या दगडाचा वापर करण्यात आला होता त्या दगडाचा नैसर्गिक गुण वाढणारा आहे. यामुळे या मूर्तीचा आकार वाढत आहे.


भक्त घालू शकत नाहीत प्रदक्षिणा 
असे सांगण्यात येते की, यागंती उमा महेश्वर मंदिरात येणारे भक्त पूर्वी नंदीला सहजपणे प्रदक्षिणा घालू शकत होते परंतु मूर्तीच्या वाढत चाललेल्या आकारामुळे आता प्रदक्षिणा घालणे शक्य नाही. नंदीची मूर्ती वाढत असल्यामुळे मंदिर प्रशासनाने तेथील एक पिलरही काढून टाकला आहे.


मंदिराचा इतिहास 
या मंदिराचे निर्माण 15 व्या शतकात करण्यात आले होते. संगमा राजवंशाचे राजा हरिहर बुक्का यांनी हे मंदिर बांधले होते. मान्यतेनुसार ऋषी अगस्त्य या ठिकाणी भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर बांधण्यास इच्छुक होते परंतु मंदिरात मूर्ती स्थापनेच्या वेळी मूर्तीच्या पायाच्या अंगठ्याचे नख तुटले. या घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी अगस्त्य ऋषींनी महादेवाची तपश्चर्या केली. त्यानंतर महादेवाच्या आशीर्वादाने अगस्त्य ऋषींनी उमा महेश्वर आणि नंदीची स्थापना केली.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पुष्करणीचे रहस्य...

बातम्या आणखी आहेत...