आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yahoo India Year In Review 2019 Report; Aamir's Film 'Dangal' The Blockbuster Film Of The Decade, Second 'Bajrangi Bhaijaan'

याहू इंडियाच्या अहवालात आमिर खानचा ‘दंगल’ दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट, दुस-या स्थानावर आहे 'बजरंगी भाईजान'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः याहू इंडियाच्या एका अहवालानुसार २०१६ मध्ये आलेला आमिर खानचा चित्रपट ‘दंगल’ चालू दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत टॉपवर आहे. या चित्रपटाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर जवळपास २१०० कोटींचा व्यवसाय केला होता. या यादीत दुसरे नाव सलमान खानचा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’चे आहे. याशिवाय आमिरचाच आणखी एक चित्रपट ‘पीके’देखील या यादीत समाविष्ट आहे.

  • सलमानला करण्यात आले सर्वाधिक सर्च

या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीशिवाय २०१९ मध्ये सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीच्या रूपात सलमान खान पुन्हा एकदा टॉप राहिला आहे. सलमानशिवाय या यादीत अमिताभ बच्चन दुसऱ्या आणि अक्षय कुमार तिसऱ्या स्थानी आहेत. तसेच सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये प्रियंका चोप्रा दुसऱ्या आणि दीपिका पदुकोण तिसऱ्या स्थानी आहेत. हृतिक रोशनला मेल स्टाइल आयकॉन आणि केवळ दोन चित्रपट नावे असलेली नवोदीत सारा अली खानला फीमेल स्टाइल आयकॉन २०१९ च्या रूपात समाविष्ट करण्यात आले आहे.

  • अशा प्रकारे राहिले परीक्षण

याहू इंडियाच्या मते, ईयर इन रिव्ह्यूचे निकाल यूजर्सच्या आवडी-निवडीच्या विश्लेषणावर आधारित आहेत. हे रिव्ह्यू त्यांनी शोधले, वाचले आणि इतरांना शिफारस करत शेअर केले आहेत.

  • हे आहेत टॉप १० भारतीय चित्रपट
चित्रपटवर्ष
दंगल२०१६
बजरंगी भाईजान२०१५
पीके२०१४
सुलतान२०१६
टायगर जिंदा है२०१७
धूम 3२०१३
संजू२०१८
वॉर२०१९
चेन्नई एक्स्प्रेस२०१३
दबंग२०१०

 

बातम्या आणखी आहेत...