आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीतलावरील सर्वात थंड शहर; तापमान रेकॉर्ड ब्रेक -70 अंश सेल्सिअस, फोटोंमध्ये पाहा Life

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियाच्या सायबेरियन प्रांतात असलेले याकूत्सक शहर जगातील सर्वात थंड शहर मानले जाते. या ठिकाणी रेकॉर्डब्रेक उणे 71 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. इतकी थंडी की डिसेंबर आणि जानेवारीत तर येथील नागरिकांनी सूर्योदय सुद्धा दिसत नाही. वर्षात 365 दिवसांपैकी 270 दिवस हे शहर गोठलेले असते. त्यावरून येथील थंडीचा अंदाज लावला जाऊ शकतो.


पृथ्‍वीतलावरील सर्वात थंड शहर
याकूत्सक शहर आर्कटिक्ट रेषेपासून केवळ 450 किलोमीटर दक्षिणेत लेना नदीच्या काठावर वसले आहे. या शहराची लोकसंख्या 27 एवढी आहे. थंडीत येथील सरासरी तापमान उणे 45 डिग्री सेल्सिअस असते. अर्थात हवेत गरम पाणी फेका खाली बर्फ होऊन पडेल. या शहराच्याच नावे आतापर्यंतचा विक्रमी निच्चांकी तापमान नोंदवण्यात आला आहे. एकदा तर शहरवासियांना उणे 71 अंश सेल्सिअसमध्ये जगण्याची वेळ आली होती. कमाल तापमान सुद्धा मायनसमध्येच असते.


याकूत्सकमधील तापमान 
सर्वसाधारणपणे येथे 12 मे ते 10 सप्टेंबरपर्यंत उन्हाळा असतो. या दरम्यान तापमान 12 डिग्री सेल्सिअस इतकी असते. 17 जुलै हा येथील सर्वात उष्‍ण दिवस असतो. या दिवशी कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस असते. दुसरीकडे हिवाळा 18 नोव्हेंबरला सुरु होतो आणि 1 मार्चपर्यंत असते. या दरम्यानचे तापमान उणे 23 डिग्री सेल्सिअस असते. 13 जानेवारी सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी तापमान कमाल उणे 36 डिग्री सेल्सिअर आणि किमान उणे 45 डिग्री सेल्सिअस असते.

 

बातम्या आणखी आहेत...