आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Java बाइकनंतर ​Yamaha RX100 सुद्धा होणार री-लाँच? कंपनीने केला मोठा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात सध्या जुन्या मोटरसायकल चालवण्याचा ट्रेंड येत आहे. रॉयल इनफील्ड पाठोपाट जावानेही त्यांची मोटारसायकव बाजारात रिलाँच केली आहे. यानंतर आता Yamaha ची लेजंड्री मोटारसायकल RX100 आणि RD350 च्या रीलाँचिंगच्या बातम्यानी जोर पकडला आहे. जावाच्या नवीन मोटरसायकलला लिक्विड कूल्ड इंजन, एबीएस आणि फ्रंट डिस्क ब्रेक सारख्या मॅाडर्न फीचर सोबत लाँच केले आहे. त्यापद्धतीने यामाहाच्या RX100 लाही नवीन आवतारात लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Motofumi Shitara यांनी दिले उत्तर...
- Yamaha मोटर्स इंडिया समूहचे चेयरमॅन Motofumi Shitara यांना एका इव्हेंटमध्ये RX 100 च्या रिलाँचिंगबद्दल विचारले असता, त्यांनी ही मोटरसायकल परत येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळासाठी RX100 मोटारसायकल रेलिव्हंट नाहीये. कारण ती एक टू स्ट्रोक मोटारसायकल आहे. भारत सरकारच्या नियमाअंतर्गत आता टू स्ट्रोक मोटरसायकलची विक्री नाही करत येत, त्यामुळे ही RX100  येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...