Home | Business | Auto | yamaha scooter in indian market

यामाहाची स्कूटर आता बाजारात येणार

वृत्तसंस्था | Update - May 29, 2011, 02:02 AM IST

दुचाकी वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या जपानमधील यामाहा कंपनीने स्कूटर बनविण्याचे निश्चित केले आहे.

  • yamaha scooter in indian market

    दुचाकी वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या जपानमधील यामाहा कंपनीने स्कूटर बनविण्याचे निश्चित केले आहे. कंपनीने पुढील वर्षामध्ये आपली पहिली स्कूटर भारतीय बाजारपेठेत आणण्याचा विचार केला आहे. कंपनीच्या अन्य एका अधिकाऱयांनी पुढच्या वर्षात भारतीय बाजारात ही स्कूटर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

    कंपनी आपल्या सुरजपूर आणि फरिदाबाद येथील विद्यमान प्रकल्पात या स्कूटरचे उत्पादन करण्याची शक्यता आहे. कंपनीची सध्या वर्षाला पाच लाख दुचाकींचे उत्पादन करण्याची क्षमता असून ती लवकरच सहा लाखांवर जाण्याची शक्यता आहे, परंतु स्कूटरसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

    निर्मितीसाठी सुरजपूर, फरिदाबाद प्रकल्पाचा विचार सुरू
    स्कूटर उत्पादन क्षमता विस्तारण्यासाठी १ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक (२१२) अमेरिका, युरोप आणि अन्य बाजारपेठेत आमच्या स्कूटर्स धावत आहेत, परंतु आता आम्ही भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करीत असून आम्हाला चांगला अहवाल आल्यास ही स्कूटर लवकरच भारतीय बाजारात येईल. - - जून नाकाता, मुख्य विक्री अधिकारी आणि संचालक, यामाहा मोटार

Trending