Home | Jeevan Mantra | Dharm | Yamdev Temple In Himachal Pradesh

मृत्यूनंतर सर्वात पहिले येथेच येतो आत्मा, चित्रगुप्त येथेच यमदेवाला सांगतात मनुष्याचे पाप-पुण्य

रिलिजन डेस्क | Update - Aug 09, 2018, 12:02 AM IST

श्रीमद् भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जन्म आणि मृत्यूचे चक्र चालूच राहते. आत्मा कधीही मरत नाही आणि

 • Yamdev Temple In Himachal Pradesh

  श्रीमद् भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जन्म आणि मृत्यूचे चक्र चालूच राहते. आत्मा कधीही मरत नाही आणि निश्चित वेळेसाठी वेगवेगळे शरीर धारण करते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा यमलोकात जातो, तेथे त्याने केलेल्या पाप-पुण्याचा हिशोब होतो आणि आत्मा स्वर्गात किंवा नरकात पाठवला जातो. यमलोकाचे राजा यमदेव आहेत. यमदेव सूर्यदेवाचे पुत्र आणि शनिदेवाचे भाऊ आहेत. यमुना यांची बहीण आहे.


  हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात यमदेवाचे एक अनोखे हे मदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. या मंदिराजवळ पोहचल्यानंतरही अनेक लोकांना मंदिरात जाण्याचे धाडस होत नाही. मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण

  या मंदिरात स्वतः धर्मराज यमदेव राहतात.

  विश्वातील हे एकमेव मंदिर यमदेवाला समर्पित आहे. या मंदिरात एक खोली आहे, जी चित्रगुप्त देवाची मानली जाते. चित्रगुप्त यमदेवाचे सचिव आहेत. हे जीवात्म्यांच्या कर्माचा हिशोब ठेवतात.

  पुढे वाचा या मंदिरासंदर्भातील इतर काही खास गोष्टी....

 • Yamdev Temple In Himachal Pradesh

  येथील मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यमदेवाचे दूत त्या व्यक्तीचा आत्मा सर्वात पहिले या मंदिरात चित्रगुप्तसमोर घेऊन येतात. चित्रगुप्त या जीवात्म्याला त्याच्या पूर्ण कर्माची माहिती देतात आणि त्यानंतर चित्रगुप्त देवाच्या खोलीतून यमदेवाच्या खोलीत त्याला नेले जाते. या खोलीला यमदेवाचे न्यायालय म्हटले जाते. याठिकाणी यमदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

 • Yamdev Temple In Himachal Pradesh

  या मंदिरात सोने, तांब, चांदी आणि लोखंडाचे चार अदृश्य दरवाजे असल्याचे मानले जाते. यमदेवाने आदेश दिल्यानंतर दूत याच दरवाजांमधून आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरुड पुराणातही यमदेवाच्या दरबारात चार दरवाजे असल्याचा उल्लेख आहे.

 • Yamdev Temple In Himachal Pradesh

Trending